CPL 2020 Points Table : सलग दुसऱ्या विजयासह नाइट रायडर्स टॉपला, सेंट लूसियानंही उघडले खाते

सुशांत जाधव
Friday, 21 August 2020

आतापर्यंत झालेल्या सामन्यात ट्रिनबागो नाइट रायडर्सने दोन पैकी दोन सामने जिंकत गुणतालिकेत अव्वलस्थानी कब्जा मिळवला आहे. तर सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स अदयापही गुणांचे खाते उघडण्याच्या प्रतिक्षेत आहे.

कॅरेबियन लीगच्या पाचव्या सामन्यात सेंट लूसिया ज्यूक्सने बारबोडोस ट्रायडेंट्सला 7 गडी राखून पराभूत करत चालू हंगामातील पहिला विजय निश्चित केला. दुसरीकडे सहाव्या सामन्यात ट्रिनबागो नाइट रायडर्सने जमेका तलावाज संघाला 7 गडी राखून पराभूत केले. आतापर्यंत झालेल्या सामन्यात ट्रिनबागो नाइट रायडर्सने दोन पैकी दोन सामने जिंकत गुणतालिकेत अव्वलस्थानी कब्जा मिळवला आहे. तर सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स अदयापही गुणांचे खाते उघडण्याच्या प्रतिक्षेत आहे. पाचव्या सामन्यातील विजयासह  सेंट लूसियाने यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला.  पहिल्या सामन्यात त्यांना जमेका तलावाजकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार सेंट लूसियाला  5 षटकात 47 धावांचे लक्ष्य मिळाले होते. 3 विकेट गमावत त्यांनी हे लक्ष्य पार केले.  

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

बारबाडोस ट्रायडेंट्सचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला होता. सलामी जोडीने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत संघाला दमदार सुरुवात करुन दिली.  3.3 षटकात सलामी जोडीने संघाच्या धावफलकावर 35 धावा लावल्या. जॉनसन चार्ल्स आक्रमक अंदाजात खेळत होता. त्याने  19 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 35 धावांची खेळी केली. शाय होपने 16 चेंडूत 19 धावा केल्या. मध्यफळीतील फलंदांजांच्या ढिसाळ कामगिरीमुळे संघाला म्हणावी तशी धावसंख्या उभारता आली नाही. प्रतिस्पर्धा संघातील फिरकीपटूंनी त्यांना मोकळेपणाने फटकेबाजी करण्याची संधी दिली नाही.  बारबाडोसने  14.3 षटकात  7 बाद 109 धावा केल्या होत्या.

कॅरेबियन लीगच्या मागील हंगामातील किंगची फटकेबाजी (व्हिडिओ)

संघाची धावसंख्या जलदगतीने वाढवण्याच्या नादात जेसन होल्डरने आपली विकेट गमावली. त्याने  12 चेंडूत  27 धावांची खेळी केली. एश्ले नर्स 15 चेंडूत 16 धावांवर नाबाद राहिला. 18.1 षटकात बारबाडोस संघाच्या धावफलकावर  7 बाद 131 धावा असताना पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सामना थांबण्यात आला. सेंट लूसियाच्या रोस्टन चेसने 2 षटकात 8 धावा खर्च करुन 2 विकेट मिळवल्या. थांबून थांबून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे सामना  5 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. सेंट लूसियाला  47 धावांचे लक्ष्य देण्यात आले. त्यांनी  4.1 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात सामना खिशात घातला.  आंद्रे फ्लेचरने 7 चेंडूत 16 धावांची नाबाद खेळी केली. मोहम्मद नबीने 6 चेंडूत 15 धावा केल्या. नबीला या हंगामातील पहिला सामनावीराचा पुरस्कार प्राप्त झाला. 

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या गड्याचा बोलबाला

संक्षिप्त धावफलक
बारबाडोस ट्रायडेंट्स : 131/7 DL (जॉनसन चार्ल्स 35, रोस्टन चेस 2/8)
सेंट लूसिया ज्यूक्स : 50/3 (आंद्रे फ्लेचर 16*, राशिद खान 2/24)

  कॅरेबियन लीग गुणतालिका   (6 सामन्यांच्या निकालानंतरची आकडेवारी)

संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण
त्रिनबागो नाइट रायडर्स 
 
2 2 0 0 4
गुयाना अमेझॉन वॉरियर्स
 
2 1 1 0 2
सेंट लुसिया जूक्स 
 
2 1 1 0 2
जमेका तलावाज
 
2 1 1 0 2
बारबाडोस ट्रायडेंट
 
2 1 1 0 2
सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स 2 0 2 0 0

 


​ ​

संबंधित बातम्या