CPL 2020 : क्रिकेट जगतातील 'वजनदार' गड्याची फटकेबाजी पाहाच (Video)

सुशांत जाधव
Thursday, 6 August 2020

2019 च्या हंगामात जमेका तलावास विरुद्धच्या सामन्यात रहकीम कॉर्नवालने अवघ्या 30 चेंडूत 75 धावांची खेळी केली होती.

कोरोनाजन्य परिस्थितीमुळे मार्चपासून मैदानात असलेली शांतता आता हळूहळू दूर होत आहे. इंग्लंडच्या मैदानातून विंडीजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली. त्यानंतर आता विंडीजमध्ये स्टार क्रिकेटर्सच्या उपस्थितीत कॅरेबियन लीगला सुरुवात होणार आहे. कॅरेबियन लीगच्या मैदानात शाहरुख खानच्या संघही सहभागी आहे. त्याच्या संघातून प्रवीण तांबेच्या रुपात पहिला भारतीय गडी या लीगमध्ये सहभागी झाल्याचे दिसेल. याशिवाय क्रिकेट जगतातील 'वजनदार' गड्याचा खेळही पाहण्यासारखा असेल.

#IPLचा मागोवा : देशी 'थप्पड' अन् परदेशी खेळाडूंनी गाजली होती स्पर्धा  

वेस्ट इंडीजच्या ताफ्यातील 26 वर्षीय अष्टपैलू खेळाडू रहकीम कॉर्नवाल गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आहे. 140 किलो वजन आणि 6 फूच 5 इंच उंची असलेला धडधाकड गडी कॅरेबियन लीगमध्येही आपल्यातील धमक दाखवण्यासाठी सज्ज असेल. प्रथम श्रेणीमध्ये जवळपास 63 सामन्यात त्याने 303 विकेटसह 2411 धावा केल्या आहेत. विंडीजमध्ये त्याला 'माउंटन मॅन' म्हणूनही ओळखले जाते. भारत अ विरुद्धच्या सामन्यात चार विकेट्स घेतल्यानंतर तो चर्चेत आला होता. त्यानंतर मोजक्या काही सामन्यात त्याने विंडीजकडून प्रतिनिधीत्व केले आहे. नुकताच विंडीजने केलेल्या इंग्लंड दौऱ्यावरही तो राष्ट्रीय संघाचा सदस्य होता. 

यंदाच्या हंगामात तो गतवर्षी खेळलेल्या सेंट लूसिया जूक्स संघाचे प्रतिनिधीत्वच करताना दिसणार आहे. 2019 च्या हंगामात जमेका तलावास विरुद्धच्या सामन्यात रहकीम कॉर्नवालने अवघ्या 30 चेंडूत 75 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे जमेकाने दिलेले 170 धावांचे  लक्ष्य कॉर्नवालच्या संघाने अवघ्या 16.4 षटकात पार केले होते. या सामन्यातील कॉर्नवालची खेळी पाहण्यासारखी अशीच होती. यंदाच्या हंगामात तो कशी खेळी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  


​ ​

संबंधित बातम्या