CPL 2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज! 

सुशांत जाधव
Thursday, 6 August 2020

क्रिकेट जगतातील प्रमुख टी-20 लीगमधील एक असलेल्या या स्पर्धेत विंडीजमधील स्टार खेळाडूंशिवाय अन्य देशातील खेळाडूही मैदानात परतताना दिसतील. 18 ऑगस्टपासून रंगणाऱ्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या आठव्या हंगामापूर्वी नजर टाकूयात या स्पर्धेत आतापर्यंत आपल्या फलंदाजीचा धमाका दाखवून देणाऱ्या 5 फलंदाजाच्या कामगिरीवर....  

जगभरात कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानादरम्यान क्रिकेटच्या मैदानातून चांगल्या बातम्या येण्यास सुरुवात झाली आहे. मार्चपासून पसरलेल्या शांततेनंतर क्रिकेटमधील खेळाडूंची पावले आता मैदानाकडे पडण्यास सुरुवात झाली आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यानंतर आता वेस्ट इंडीजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) 2020 ची सुरुवात होत आहे. क्रिकेट जगतातील प्रमुख टी-20 लीगमधील एक असलेल्या या स्पर्धेत विंडीजमधील स्टार खेळाडूंशिवाय अन्य देशातील खेळाडूही मैदानात परतताना दिसतील. 18 ऑगस्टपासून रंगणाऱ्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या आठव्या हंगामापूर्वी नजर टाकूयात या स्पर्धेत आतापर्यंत आपल्या फलंदाजीचा धमाका दाखवून देणाऱ्या 5 फलंदाजाच्या कामगिरीवर....  

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

ख्रिस गेल

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम हा यूनिवर्स बॉस ख्रिस गेलच्या नावावर आहे  गेलने सीपीएलमधील 76 सामन्यातीव 74 डावात 39.23 च्या सरासरीने 2354 धावा केल्या आहेत. 133.44 च्या  स्ट्राइक रेटने धावा करताना गेलनं  4 शतक आणि 13 अर्धशतक झळकावली आहेत. यात 116 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. वैयक्तिक कारणास्तव यंदाच्या स्पर्धेतून त्याने माघार घेतली असल्यामुळे त्याचा धमाका यंदा पाहायला मिळणार नाही. 

लेंडल सिमंस

ट्रिनबागो नाइट राइडर्सच्या उजव्या हाताने फटकेबाजी करणाऱ्या सिमंसनं  सीपीएलमधील 71 सामन्यातील 69 डावात 33.01च्या सरासरीनं 2080 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याने 120.09 च्या स्ट्राइक रेट ठेवले. आतापर्यंत त्याने 16 अर्धशतक झळकावली असून  97 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. 

आंद्रे फ्लेचर

सेंट लूसिया जॉक्सकडून खेळणाऱ्या आंद्रे फ्लेचर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 66 सामन्यातील 66 डावात 31.16 च्या सरासरीने 1870 धावा केल्या आहेत.  त्याने 117.31 स्ट्राइक रेट ठेवले आहे. फ्लेचरच्या नावे सीपीएलमध्ये 11 अर्धशतकांची नोद असून नाबाद  84* ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. 

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...  

जॉनसन चार्ल्स

विद्यमान चॅम्पियन बारबाडोस ट्रिडेंट्सचा फलंदाज जॉनसन चार्ल्सने आतापर्यंतच्या हंगामातील  68 सामन्यातील 68 डावात 27.90 च्या सरासरीनं 1842 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 130.36 स्ट्राइक रेट मेंटन केल्याचे पाहायला मिळाले. त्याने 12 अर्धशतक झळकावली असून नाबाद 94 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. 

चॅडविक वाल्टन 

सीपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजामध्ये जमेका थलायवाजच्या चॅडविक वाल्टनने स्थान मिळवले आहे. त्याने 73 सामन्यातील 73 डावात  26.55 च्या सरासरीनं 1779 धावा केल्या आहेत.  यादरम्यान वाल्टनने  121.68 स्ट्राइक रेट असून 9 अर्धशतकही त्याच्या नावे आहेत.  97 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. 


​ ​

संबंधित बातम्या