CPL2020 : आयपीएलपूर्वी कॅरेबियन लीगमध्ये मुंबई vs चेन्नई झलक दिसणार

सुशांत जाधव
Monday, 17 August 2020

युएईत रंगणाऱ्या आयपीएलमध्ये दिसणारे काही खेळाडू देखील या लीगमध्ये सहभागी असतील.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संकटजन्य परिस्थितून क्रिकेट हळूहळू सावरत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. आता कॅरेबियन लीगच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचा उत्साह आणखी वाढण्यास सुरुवात होणार आहे. 18 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होत असून युएईत रंगणाऱ्या आयपीएलमध्ये दिसणारे काही खेळाडू देखील या लीगमध्ये सहभागी असतील. या खेळाडूंसाठी आयपीएलच्या तयारीसाठीची ही रंगीत तालीमच ठरेल. 

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

क्रिस लिन : सेंट किट्स अँण्ड नेविस पॅटिरॉयट्स

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज क्रिस लिनच्या फटकेबाजीकडे सर्वांचे लक्ष असेल.  क्रिस लिनने 41 आयपीएल सामन्यात 33 च्या सरासरीने 1280 धावा केल्या आहेत. तो संघाचा डाव सुरु करण्याची जबाबदारी चोख बजावण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. त्याचा स्ट्राइक रेट जवळपास 140 च्या घरात असून  सेंट किट्स अँण्ड नेविस पॅटिरॉयट्ससाठी तो कितपत फायदेशीर ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सने क्रिस लिनसाठी दोन कोटी रुपये मोजले आहेत.  

राशिद खान : बारबाडोस ट्रिडेंट्स

21 वर्षीय राशिद खानही कॅरेबियन लीगमध्ये आपल्या फिरकीची जादू दाखवण्यास उत्सुक असेल.  राशिदने आयपीएलमध्ये 46 सामन्यात 55 विकेट घेतल्या आहेत. गोलंदाजीसह फलंदाजी वेळी देखील तो आपल्या भात्यातून कमालीची फटकेबाजी दाखवून देण्यात माहिर आहे. आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधीत्व करतो. 

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या गड्याचा बोलबाला

इमरान ताहिर: गुयाना अमेझॉन वॉरियर्स

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर इमरान ताहिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी लीग सामन्यात त्याचा खेळ अनुभवायला मिळणार आहे. आयपीएमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुयाना अमेझॉनकडून कशा पद्धतीने खेळ दाखवतो हे पाहणे उत्सकतेचे ठरेल. आयपीएलमध्ये इमरान ताहिरच्या नावे  55 सामन्यात 79 विकेट आहेत. त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जला अनेक सामने जिंकून दिले आहेत.  

मिशेल सेंटनर- बारबाडोस ट्रिडेंट्स

सेंटनरने आयपीएलमध्ये केवळ चार सामने खेळले असले तरी 20 सामन्यातील त्याचा अनुभव तगडा आहे.  कसोटी, वनडे आणि टी-20 तील त्याचे रेकॉर्ड उत्तम आहे.   आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात त्याने 52 विकेट मिळवल्या आहेत. अष्टपैलू खेळीन सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता सेंटनरमध्ये आहे. न्यूझीलंडचा हा गडी चेन्नईच्या ताफ्यातून खेळताना दिसला आहे.  

मुजीब उर रहमान : जमेका थलायवाज

किंग्स इलेवन पंजाबकडून आयपीएलमध्ये खेळणारा  मुजीब उर रहमान जमैका जमेका थलायवाजकडून मैदानात उतरणार आहे. त्याने आयपीएलमधील  16 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून सामन्याला रोमहर्षक स्थितीत आणण्याची क्षमता या गोलंदाजात आहे.  


​ ​

संबंधित बातम्या