व्हेंटिलेटरवरील क्रिकेटला या मैदानांवर मिळू शकेल नवसंजीवनी

टीम ई-सकाळ
Wednesday, 10 June 2020

या मैदानात पूर्वीचा माहोल कधी येणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. चाहत्यांना लागू असलेली उत्सुकता संपवून लवकरात लवकर पुन्हा मैदानात उतरण्यासाठी खेळाडूही सज्ज आहेत. योग्य ती खबरदारी घेऊन क्रिकेटच्या मैदानातील सामने पुन्हा रंगणार आहेत.

ऑकलंड : कोरोना विषाणूच्या जगभरातील थैमानाचा खेळालाही मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना जगभरातील देशात विविध खेळ स्पर्धेला ब्रेक लागला. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून क्रिकेटची मैदानेही ओस पडली आहेत. या मैदानात पूर्वीचा माहोल कधी दिसणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. चाहत्यांना लागून असलेली उत्सुकता संपवून लवकरात लवकर पुन्हा मैदानात उतरण्यासाठी खेळाडूही सज्ज आहेत. योग्य ती खबरदारी घेऊन क्रिकेटच्या मैदानातील सामने पुन्हा रंगणार आहेत. यासाठी आयसीसीने काही महत्त्वपूर्ण नियमही लागू केले आहेत. वेस्ट इंडिजचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला पोहचला देखील आहे. पण सर्वात मोठा चिंता आहे ती म्हणजे विविध देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा अजूनही पूर्णत: थांबलेला नाही. अशा परिस्थितीत क्रिकेटसाठी न्यूझीलंडमधील मैदाने उत्तम पर्याय ठरु शकतील, असे मत खेळाडू महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिथ मिल्स यांनी व्यक्त केले आहे. 

#वर्णभेदाचा_खेळ : भेदभाव नडला अन् 22 वर्ष वनवास भोगला!

न्यूझीलंड सरकारने नुकतीच देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. याचाच दाखला हिथ मिल्स यांनी दिलाय. क्रिकेटच्या आगामी स्पर्धेसाठी न्यूझीलंडमधील मैदाने एक उत्तम पर्याय म्हणून वापरता येऊ शकतील, असे ते म्हणाले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे बंद आहे. भारताने न्यूजीलँडविरुद्ध अखेरची कसोटी मालिका खेळली होती. न्यूझीलंडमध्ये मागील 17 दिवसांत  कोरोनाची लागण झालेला एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. न्यूझीलँड पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी याबाबतची घोषणाही केली.  

कोरोनामुळ ICC ने बदललेल्या नियमाचा फायदा तोटा कुणाला?

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मिल्स म्हणाले की, सध्याच्या घडीला क्रिकेटला नव संजीवनी देण्यासाठी न्यूझीलंड एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड इंग्लंड आणि वेस्ट क्रिकेट बोर्डासह अन्य क्रिकेट बोर्डाच्या संपर्कात असून न्यूझीलंडमध्ये स्पर्धा खेळवण्याचा त्यांचा विचार सुरु आहे.  बोर्ड त्रयस्त कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या नियोजनाबाबतही विचार करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. क्रिकेटच्या मैदानात तटस्थ ठिकाण ही नवी गोष्ट नाही. 2009 मध्ये पाकिस्तानमधील लाहोरमध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्या पाकच्या घरच्या मैदानातील सामने हे संयुक्त अरब अमिरात येथे खेळवण्यात आले आहेत. भारतीय क्रिकेट मंडळाची लोकप्रिय स्पर्धा असलेली आयपीएल स्पर्धाही दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगल्याचे पाहायला मिळाले आहे.

अमेरिकेला लागलेत क्रिकेटचे 'डोहाळे'; T-20 वर्ल्डकपची करायचीय मेजवाणी  

न्यूझीलंडमध्ये एकूण  1,504 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. याठिकाणी 22 लोकांनी या महा रोगामुळे आपला जीव गमावला आहे. सध्याच्या परिस्थितीला याठिकाणी एकही रुग्ण नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गती देण्यासाठी न्यूझीलंड महत्त्वपूर्ण भूमिका घेऊ शकते. न्यूझीलंड बोर्डासह अन्य देशातील क्रिकेट मंडळ यावर कसा विचार करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


​ ​

संबंधित बातम्या