ऑस्ट्रेलियात कार्यरत भारतीय नर्सवर कौतुकांचा वर्षाव, गिल्लीने शेअर केला खास व्हिडिओ

टीम ई-सकाळ
Friday, 12 June 2020

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरही या नर्सच्या कामाने प्रभावित झालाय. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत तिचे आभार मानले आहेत.

सिडनी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर आणि आघाडीच्या उत्तम यष्टिरक्षकांच्या यादीत ज्याचे नाव घेतले जाते त्या अ‍ॅडम गिलख्रिस्टने भारतीय नर्सच्या कामाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. भारतीय वंशाची नर्स शेरॉन वर्गीस ऑस्ट्रेलियात कोरोनाच्या लढ्याविरोधात मैदानात उतरुन आपले कर्तव्य बजावत आहे. कोरोनाजन्य परिस्थितीत आहोरात्र कष्ट घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळते. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनिय आणि लक्षवेधी काम करणाऱ्या नर्सच्या यादीत आता शेरॉन वर्गीस या भारतीय वंशाच्या नर्सचाही समावेश झालाय. शेरॉन सध्या वॉलोंगोंगस्थित केयर होममध्ये सेवा देत आहे. यूनिवर्सिटी ऑफ वॉलोंगोंगमध्ये लॉकडाउनच्या काळात निस्वार्थवृत्तीने सेवा देत शेरॉन वर्गीसने जगाला एक अनोखा संदेश दिलाय.   

IPL बाबत दादा ठाम; आर्थिक संकटावर मात करण्यासाठी असा असू शकेल 'गेम_प्लॅन'

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरही या नर्सच्या कामाने प्रभावित झालाय. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत तिचे आभार मानले आहेत. गिलख्रिस्टने व्हिडिओमध्ये म्हटलंय की, शेरॉन निस्वार्थ सेवेबद्दल तुझे खूप खूप आभार! संपूर्ण ऑस्ट्रेलिया आणि भारतासह तुझ्या कुटुंबियांना अभिमान वाटावा असे कार्य तू करत आहते. तू अशीच काम करत राहा आम्ही सर्व तुझ्या पाठिशी आहोत.

जाफरने अनमोल सेहवागकडे केला कानाडोळा; भज्जी म्हणाला असं का?  

यूनाइटेड नर्सेस असोसिएशनने देखील शेरॉनच्या कार्याची दखल घेतली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय की,  20 लाख नर्समध्ये जवळपास 15 लाख नर्सेस या केरळमधील आहेत. गिलिख्रिस्टने केलेल्या कौतुकावर खुद्द शेरॉनने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रतिक्रियाही दिली होती. वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्याने केलेले कौतुकामुळे भारावून गेले आहे, असे तिने म्हटले होते. कोट्टायमची मूळ रहिवाशी असलेली शेरॉन 2016 पासून ऑस्ट्रेलियात कार्यरत आहे. तिने वॉलोंगोंग यूनिवर्सिटीमध्ये आपले शिक्षण घेतले. त्यानंतर ती याच ठिकाणी आपतकालीन विभागात कार्यरत आहे.  


​ ​

संबंधित बातम्या