कोरोनामुळे क्रीडा स्पर्धांचा झाला खेळ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

‘एआयएफएफ’ने देशभरात कोरोनामुळे उदभवलेली स्थिती लक्षात घेऊन स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे त्यांनी पत्रक काढले आहे. या निर्णयाचा फटका आय-लीग, हिरो दुसरी विभागीय स्पर्धा, हिरो युवा लीग, गोल्डन बेबी लीग तसेच राष्ट्रीय स्पर्धाना बसणार आहे. 

एआयएफएफने आय-लीगसह देशातील सर्व फुटबॉल स्पर्धा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या आहेत. करोनाबाबत घेतलेल्या राज्य सरकारांच्या भूमिकेमुळे सर्व स्पर्धा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या आहेत.

‘एआयएफएफ’ने देशभरात कोरोनामुळे उदभवलेली स्थिती लक्षात घेऊन स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे त्यांनी पत्रक काढले आहे.या निर्णयाचा फटका आय-लीग, हिरो दुसरी विभागीय स्पर्धा, हिरो युवा लीग, गोल्डन बेबी लीग तसेच राष्ट्रीय स्पर्धाना बसणार आहे. 

जर्मनी वि. इटली सामना रद्द
 जर्मनी आणि इटली यांच्यात ३१ मार्च रोजी न्यूरेमबर्ग येथे होणारा आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना रद्द झाला आहे. या सामन्यासाठी क्रीडाप्रेमी आले नाही तरीही आयोजक आणि टीमचीच संख्या मोठी असल्याने सामना रद्द करण्यावर सहमती झाली. तसं निवेदन जर्मन फुटबॉल महासंघाने केलं आहे. जर्मनी संघ २६ मार्च रोजी माद्रिदविरुद्ध स्पेनमध्ये खेळणार आहे, पण या सामन्याच्या आयोजनाविषयी अद्यापि कोणतीही निर्णय झालेला नाही.

सर्व आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने लांबणीवर
मार्च आणि एप्रिल महिन्यांत होणारे सर्व आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने लांबणीवर टाकण्याची शिफारस आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) केली आहे. आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील २०२२ फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीचे सामने पुढे ढकलले आहेत. असेल.

बुंडेसलीगामधील पॅडरबॉर्न या संघातील फुटबॉलपटूला करोनाची बाधा झाली आहे. २० वर्षीय लुका किलियन असे त्याचे नाव आहे. त्याच्या सर्व सहकाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. ‘‘किलियनशी संपर्कात असलेल्या प्रत्येकाची ५ मार्चपासून नित्यनेमाने वैद्यकीय तपासणी सुरू आहे. या सर्वाना इतरांपासूून किमान २ किलोमीटर अंतर राखण्यास सांगण्यात आले आहे. सर्वाची प्रकृती स्थिर आहे,’’ असे पॅडरबॉर्न क्लबने म्हटले आहे.

भारतातील अन्य स्पर्धानाही फटका
करोनाचा फटका आता भारतातील अन्य स्पर्धानाही बसला आहे.
भोपाळ येथे ६ ते ८ एप्रिलदरम्यान रंगणारी फेडरेशन चषक राष्ट्रीय कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा लांबणीवर पडली आहे.
नवी दिल्ली येथे १९ ते २२ मार्चदरम्यान होणारी इंडिया खुली गोल्फ स्पर्धा पुढे ढकलली आहे.
सर्व देशांतर्गत टेनिस स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहे.. 
नवी दिल्लीत १५ ते २५ मार्चदरम्यान रंगणारी ‘आयएसएसएफ’ विश्वचषक रायफल, पिस्तूल आणि शॉटगन स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा रद्द
नवी दिल्ली : करोनाच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) १६ मार्चपासूनच्या सर्व स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा तात्पुरत्या कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्विस खुली, इंडिया खुली, ऑरलेन्स मास्टर्स, मलेशिया खुली, सिंगापूर खुली या महत्त्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेनंतर पुढील आदेश मिळेपर्यंत कोणतीही महत्त्वाची स्पर्धा आयोजित करू नये, असे ‘बीडब्ल्यूएफ’ने म्हटले आहे. इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा नवी दिल्लीत २४ ते २९ मार्चदरम्यान खेळवण्यात येणार होती.

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) प्रो हॉकी लीगचे सामने १५ एप्रिलपर्यंत स्थगित केले आहेत. ‘‘सर्व सहभागी संघांनी प्रो हॉकी लीगमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. ‘एफआयएच’ने १५ एप्रिलपर्यंतचे सामने स्थगित केले आहेत.ऑलिम्पिकच्या आधी सर्व सामने खेळवण्यात येतील,’’ असे ‘एफआयएच’चे मुख्य कार्यकारी अधिकारी थिएरी वेल यांनी म्हटले आहे


​ ​

संबंधित बातम्या