कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फिफा आणि एएफसीने घेतला मोठा निर्णय  

टीम ई-सकाळ
Thursday, 13 August 2020

एशियन फुटबॉल कन्फेडरेशनने (एएफसी) 2022 विश्व कप आणि 2023 आशियाई चषक स्पर्धेच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पुरुषांच्या पात्रता फेरीतील सामन्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूच्या साथीमुळे 2022 फिफा वर्ल्ड कपच्या आशियाई पात्रता सामने 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्यामुळे भारतीय फुटबॉल संघ यावर्षी कोणतेही सामने खेळणार नाही. एशियन फुटबॉल कन्फेडरेशनने (एएफसी) 2022 विश्व कप आणि 2023 आशियाई चषक स्पर्धेच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पुरुषांच्या पात्रता फेरीतील सामन्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ 2022 मधील वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत पुढील स्थानासाठीच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर पडला आहे. मात्र 2023 आशियाई चषक स्पर्धेच्या पात्रता शर्यतीत अद्याप कायम आहे.

EngvsPak : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात उद्या रंगणार दुसरा कसोटी सामना   

फिफा आणि एएफसीने विविध देशांमधील कोरोनाच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन उर्वरित पात्रता फेरीतील सामने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. फिफा आणि एएफसीने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात, बर्‍याच देशांमधील सध्याच्या कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, कतार मध्ये होणाऱ्या 2022 फिफा वर्ल्ड कप आणि  2023 मध्ये चीन येथे होणाऱ्या एएफसी आशियाई चषक स्पर्धेच्या यावर्षीच्या पात्रता खेळी सामन्यांचे आयोजन पुढील वर्षी पर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय फिफा आणि एएफसी काही काळ या प्रदेशातील परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी एकत्र काम करत राहतील आणि  त्यानंतर संबंधित सामन्यांचे वेळापत्रक पुन्हा नियोजित करण्यात येणार असल्याचे या संयुक्त निवेदनात सांगण्यात आले आहे. 

कोरोनामुळे फ्रान्समधील मॅरेथॉन स्पर्धा रद्द  

भारतीय संघाला 2022 मधील वर्ल्ड कपच्या पात्रतेसाठी मागील वर्षी मस्कट येथे झालेल्या ओमान विरुद्धच्या सामन्यात 0 - 1 ने हार पत्करावी लागली होती. त्यामुळे भारत 2022 मधील वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीतील शर्यतीतून यापूर्वीच बाहेर पडला. तर भारत 2023 आशियाई चषक स्पर्धेच्या पात्रता शर्यतीत कायम असून, त्यासाठी भारताचा सामना ऑक्टोबर मध्ये कतार सोबत आणि नोव्हेंबर मध्ये अफगानिस्तान विरोधात खेळणार होता. हे दोन्ही सामने भारतातच खेळले जाणार होते. तर या दोन्ही सामन्यानंतर भारताची लढत बांगलादेश सोबत त्यांच्याच धरतीवर होणार होती.

आगामी टी-20 वर्ल्डकपला धोनीची उपस्थिती इतकी महत्त्वाची नाही ; वाचा कोण म्हणाले असे   

दरम्यान, भारतात  आत्तापर्यंत 23 लाख 96 हजार 637 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, 47 हजार 33 जणांचा जीव गेला आहे. तर संपूर्ण जगभरात आत्तापर्यंत 2,06,37,374 नागरिकांना  कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. आणि 7 लाख 49 हजार 656 जणांचा मृत्यू झालेला आहे.


​ ​

संबंधित बातम्या