नेमबाजी मार्गदर्शकांना कोरोनाची लागण ; भारतीय शिबिर होणाऱ्या ठिकाणालाच दिली होती भेट

संजय घारपुरे
Thursday, 30 July 2020

राजधानीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर भारतीय नेमबाजांचे 1 ऑगस्टपासून सुरू होणारे शिबिर अनिश्‍चित आहे. त्याची अनिश्‍चितता रेंजवर मार्गदर्शन करीत असलेल्या मार्गदर्शकांना कोरोना झाल्यामुळे वाढली आहे. 

नवी दिल्ली : राजधानीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर भारतीय नेमबाजांचे 1 ऑगस्टपासून सुरू होणारे शिबिर अनिश्‍चित आहे. त्याची अनिश्‍चितता रेंजवर मार्गदर्शन करीत असलेल्या मार्गदर्शकांना कोरोना झाल्यामुळे वाढली आहे. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

या रेंजवर मार्गदर्शन करीत असलेल्या महिला मार्गदर्शकास कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र त्या कोणाच्याही संपर्कात आलेल्या नाहीत. त्यामुळे रेंजवरील सराव सुरू राहणार असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. रेंजची मालकी क्रीडा प्राधिकरणाकडे आहे. या रेंजवरील सराव 8 जुलैपासून सुरू झाला आहे. 

`वदे भारत'द्वारे परदेशी कुस्ती कोच भारतात    

नेमबाजी मार्गदर्शिका केवळ प्रशासकीय विभागात आल्या होत्या. त्या प्रत्यक्ष सराव होत असलेल्या ठिकाणी गेल्या नव्हत्या. तसेच कोणा नेमबाजांशी त्यांचा संपर्कही आला नव्हता. त्या मार्गदर्शकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजल्यावर संपूर्ण रेंजचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.   


​ ​

संबंधित बातम्या