फॉर्म्युला वन रेसर सर्जिओ पेरेझला कोरोनाचा संसर्ग 

टीम ई-सकाळ
Saturday, 1 August 2020

फॉर्म्युला वन रेस मधील ड्रायव्हर सर्जिओ पेरेझला कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी मिळाली आहे.

फॉर्म्युला वन रेस मधील ड्रायव्हर सर्जिओ पेरेझला कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी मिळाली आहे. हंगेरी आणि ब्रिटनमधील शर्यतीच्या दरम्यान मेक्सिकोला केलेल्या प्रवासात आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असल्याचे सर्जिओ पेरेझने म्हटले आहे. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

जुलै महिन्यातील गुरुवारी ३० तारखेला सर्जिओ पेरेझची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर या चाचणीचा अहवाल सकारत्मक आला आहे. त्यामुळे उद्या रविवारी सिल्व्हरस्टोन येथे होणाऱ्या रेसच्या शर्यतीत सर्जिओ पेरेझ सहभागी होऊ शकणार नाही. याशिवाय सर्जिओ पेरेझला पुढील काही दिवसांसाठी विलगीकरणार राहावे लागणार असून, पुढील चाचणी निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत कोणत्याच रेस मध्ये उतरता येणार नाही. त्यामुळे सिल्व्हरस्टोनच्याच ट्रॅकवर  पुढील आठवड्याच्या दुसर्‍या शर्यतीत देखील सर्जिओ पेरेझ भाग घेऊ शकणार नाही. 

एका मोठ्या अपघातात सर्जिओ पेरेझच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पेरेझ त्याच्या आईला भेटण्यासाठी मेक्सिकोला गेला होता. कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी मिळाल्यानंतर, पेरेझने आगामी शर्यतीत भाग न घेणे हे कारकीर्दीतील सर्वात वाईट असल्याचे म्हटले आहे. तसेच एका विषाणूपासून सर्वचजण किती असुरक्षित आहेत हेच या घटनेतून समोर येत असल्याचे सर्जिओ पेरेझने म्हटले आहे. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

दरम्यान, संपूर्ण जगभरात कोरोनाचा विळखा पसरला आहे. मेक्सिकोत 4 लाख 24 हजार 636 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, 46 हजार 688 जणांचा जीव गेला आहे. तर संपूर्ण जगभरात आत्तापर्यंत 1,76,13,859 नागरिकांना  कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. आणि 6 लाख 79 हजार 986 जणांचा मृत्यू झालेला आहे.              


​ ​

संबंधित बातम्या