बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग

टीम ई-सकाळ
Saturday, 20 June 2020

सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहाशीष यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांच्या सोबत आई आणि वडील तसेच घरातील काम करणाऱ्या सदस्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती मिळत आहे. सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहाशीष यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांच्या सोबत आई आणि वडील तसेच घरातील काम करणाऱ्या सदस्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी देखील भारतीय क्रिकेट जगतातील अन्य एकाच्या कटुंबातील सदस्यास कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले होते.

भारताचा माजी कर्णधार व बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली यांचा मोठा भाऊ स्नेहाशीष यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांच्यासोबत आई, वडील व घरामध्ये काम करणाऱ्या अन्य एका व्यक्तीला कोरोना झाला आहे. त्यामुळे सौरव गांगुलीच्या कटुंबीयांपर्यंत कोरोनाने धडक मारल्याने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोग्यसंबंधित काही तक्रारी पुढे आल्याने या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या चाचणीमध्ये स्नेहाशीष सोडून उर्वरित इतर सदस्यांचे अहवाल सकारात्मक आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे कळते.         

दरम्यान, स्नेहाशीष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ आहे. व तसेच सध्या स्नेहाशीष हे बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या सचिव पदावर कार्यरत आहेत. सौरव गांगुलीने क्रिकेटच्या सुरवातीचे धडे स्नेहाशीष यांच्याकडूनच घेतले होते. तर स्नेहाशीष यांनी यापूर्वी रणजीचे सामने खेळले आहेत. याव्यतिरिक्त बंगाल क्रिकेट असोसिएशन मधील सदस्यालाच मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. बंगाल क्रिकेट असोसिएशन संघाच्या निवड समितीतील एका सदस्याला कोरोना झाल्याच्या वृत्तास बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी दुजोरा दिला होता. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव आता भारतीय क्रिकेट मध्ये झाल्याचे समोर येत आहे.      

 


​ ​

संबंधित बातम्या