कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धाही लांबणीवर

वृत्तसंस्था
Wednesday, 18 March 2020

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्याचा निर्णय दक्षिण अमेरिका फुटबॉल महासंघाने घेतला. ही स्पर्धा यंदा १२ जून ते १२ जुलैदरम्यान कोलंबिया; तसेच अर्जेंटिनात होणार होती.

रिओ दी जेनेरिओ: कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्याचा निर्णय दक्षिण अमेरिका फुटबॉल महासंघाने घेतला. ही स्पर्धा यंदा १२ जून ते १२ जुलैदरम्यान कोलंबिया; तसेच अर्जेंटिनात होणार होती. नव्या कार्यक्रमानुसार ही स्पर्धा ११ जून ते ११ जुलै २०२१ दरम्यान होईल.

रोनाल्डोचं हॉटेल बनलं कोरोनाग्रस्तांचं हॉस्पीटल... खरंय का..

एखादी स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय सोपा नसतो; पण सर्वंकष विचार करूनच हा निर्णय घेतला आहे, असे दक्षिण अमेरिका संघटनेचे अध्यक्ष अलजेंद्रो डॉमिनिगुएझ यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या