कूकने निवडलेल्या सर्वोत्तम संघात एकाही भारतीयाला नाही स्थान

वृत्तसंस्था
Thursday, 6 September 2018

लंडन : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला इंग्लंडचा माजी कर्णधार व सलामीवीर ऍलिस्टर कूक याने निवडलेल्या सर्वोत्तम संघात एकही भारतीय खेळाडूला स्थान दिलेले नाही.

कूकने नुकतेच भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. इंग्लंडने भारताविरुद्धची मालिका 3-1 अशी जिंकून त्याला विजयी भेट दिलेली आहे. कूक जरी आपल्या कारकिर्दीची अखेर भारताविरुद्ध करणार असला तरी त्याने भारताच्या अनेक महान क्रिकेटपटूंना वगळून आपला सर्वकालीन सर्वोत्तम संघ निवडला आहे.

कूकने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, द वॉल राहुल द्रविड यासारख्या फलंदाजांना वगळले आहेच. यासह एकही फिरकीपटू किंवा जलदगती गोलंदाजांना संघात स्थान दिलेले नाही. त्याने या यादीत श्रीलंकेच्या दोन खेळाडूंचा समावेश केला आहे.

कुकने निवडलेला सर्वोत्तम संघ : ग्रॅहम गूच, मॅथ्यू हेडन, ब्रायन लारा, रिकी पाँटिंग, एबी डिव्हिलर्स, कुमार संगकारा, जॅक कॅलिस, मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्रा.

​ ​

संबंधित बातम्या