...म्हणून कुकला पुरविली बियरच्या बाटल्यांची रसद

वृत्तसंस्था
Tuesday, 11 September 2018

आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या ऍलिस्टर कुकने पाचव्या कसोटी सामन्यात 147 धावांची शानदार खेळी करत आपल्या कारकिर्दीची सांगता केली. कसोटी क्रिकेटमधील 33वे शतक साजरा करणाऱ्या कुकला त्याच्या या कामगिरीबद्दल खास गिफ्टही देण्यात आले.

लंडन : आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या ऍलिस्टर कुकने पाचव्या कसोटी सामन्यात 147 धावांची शानदार खेळी करत आपल्या कारकिर्दीची सांगता केली. कसोटी क्रिकेटमधील 33वे शतक साजरा करणाऱ्या कुकला त्याच्या या कामगिरीबद्दल खास गिफ्टही देण्यात आले. 

सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कुकचे सर्वांनी मनापासून अभिनंदन केले. त्यानंतर एका इंग्लिश पत्रकाराने ''मी तुझ्यासाठी एक खास भेट आणली आहे असे म्हणत तो कुकजवळ आला आणि त्याने कुकला एक बॉक्स दिला. या बॉक्समध्ये बिअरच्या 33 बाटल्या होत्या. 

''तु मागे एकदा मला म्हणाला होतास, की तु वाईनचा चाहता नसून तुला बिअर आवडते, म्हणून मी तु केलेल्या 33 शतकांसाठी तुला या 33 बिअर बाटल्या भेट म्हणून देत आहे,'' असे म्हणत त्याने तो बॉक्स कुकच्या हातात सोपवला. कुकनेसुद्धा प्रचंड प्रेमाने त्या गिफ्टचा स्वीकार केला.

पदार्पणाच्या आणि अखेरच्या सामन्यात शतक झळकावणारा तो क्रिकेटविश्वातील अवघा पाचवा खेळाडू ठरला आहे. तसेच कारकिर्दीतील पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात एकाच संघाविरुद्ध शतक झळकावणारा तो क्रिकेटविश्वातील अवघा तिसरा खेळाडू आहे.


​ ​

संबंधित बातम्या