अखेरच्या सामन्यातही कुकने रचले दोन विक्रम 

वृत्तसंस्था
Friday, 7 September 2018

लंडन : कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळणारा इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने या सामन्यातही दोन विक्रम केले आहेत. भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा तो क्रीडा विश्वातील पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने भारताविरुद्ध 29 कसोटी सामने खेळले आहेत. 

त्याचबरोबर कुकने ओव्हल मैदानावर हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. कुकने या सामन्यातील दुसऱ्या षटकात अप्रतिम कव्हर ड्राईव्ह मारत तीन धावा घेतल्या आणि आपल्या हजार धावा पूर्ण केल्या. यापूर्वी त्याने फक्त लॉर्ड्सच्या मैदानावर 1735 धावा केल्या आहेत. कुकने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. 

सामना सुरु झाल्यावर प्रेक्षक आणि दोन्ही संघांकडून त्याचे खास पद्धतीने स्वागतही करण्यात आले.  
 
​ ​

संबंधित बातम्या