मध्य प्रदेश क्रिकेटमध्ये प्रशिक्षकपदावरून वाद

संजय घारपुरे
Thursday, 30 July 2020

चंद्रकांत पंडीत यांची मध्य प्रदेशने मार्चमध्येच मार्गदर्शकपदी नियुक्ती केली होती. पण आता त्यांच्या नियुक्तीवरुन मध्य प्रदेश क्रिकेटमध्ये वादळ सुरु झाले आहे.

मुंबई : चंद्रकांत पंडीत यांची मध्य प्रदेशने मार्चमध्येच मार्गदर्शकपदी नियुक्ती केली होती. पण आता त्यांच्या नियुक्तीवरुन मध्य प्रदेश क्रिकेटमध्ये वादळ सुरु झाले आहे. कार्यकारीणीने आम्हाला न विचारताच ही नियुक्ती केल्याचा आरोप क्रिकेट समितीने केला आहे. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

मध्य प्रदेशच्या क्रिकेट मार्गदर्शकांची नियुक्ती क्रिकेट समितीच करु शकते. आम्ही पंडीत किंवा कोणाच्याही विरोधात नाही, पण या नियुक्तीने आमच्या हक्कांवर गदा येत आहे. त्यांच्या नियुक्तीची जबाबदारीही आमची आहे. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेत नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप समितीने केला. या समितीत योगेश गोळवलकर, प्रशांत द्विवेदी, मुर्तझा अली यांचा समावेश आहे. 

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने हे आरोप फेटाळले आहेत. पंडीत यांची नियुक्ती संघटनेच्या घटनेनुसारच झाली आहे. क्रिकेट समितीचा या नियुक्तीच्या प्रत्येक टप्प्यात सहभाग होता. त्यांनी या नियुक्तीस मंजूरी दिली होती. आता निष्कारण वाद केला जात आहे, असे संघटनेचे सचिव संजीव राव यांनी सांगितले त्यांनी पंडीत यांच्याबरोबरील करार दोन वर्षांचा आहे असे सांगितले. 

`वदे भारत'द्वारे परदेशी कुस्ती कोच भारतात    

पंडीत गतमोसमापर्यंत विदर्भचे मार्गदर्शक होते. विदर्भने चांगली कामगिरी केल्यामुळे पंडीतच मार्गदर्शक राहतील अशी अपेक्षा होती. मात्र पंडीत यांनी त्याऐवजी मध्य प्रदेशचे मार्गदर्शकपद स्वीकारले. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी मार्गदर्शकात पंडीत यांची गणना होते.


​ ​

संबंधित बातम्या