INDvsSA : सत्ते पे सत्ता! महानायकला किंग कोहलीची सप्तरंगी बर्थडे गिफ्ट 

शैलेश नागवेकर
Friday, 11 October 2019

अमिताभ बच्चन मुंबईत आपला 77 वा वाढदिवस साजरा करत असताना केवळ एक्‍सप्रेस वेचे अंतर असलेल्या पुण्यात त्यांना भारतीय क्रिकेटचा आधुनिक महानायक विराट कोहली त्यांना सात या अंकाशी साधर्म्य असलेली वाढदिवसाची अनोखी भेट देत होता. हा योगायोग असला तरी दोन्हीकडचे कर्तुत्व अतिमहान.​

पुणे : तारीख भले 11 असेल परंतु आज "सात' या अंकाचे अनन्यसाधारण महत्व आहे. भारतीय अभिनयात आकाशाला गवसणी घालणारी उंची गाठणारे बीग बी अर्थात अमिताभ बच्चन मुंबईत आपला 77 वा वाढदिवस साजरा करत असताना केवळ एक्‍सप्रेस वेचे अंतर असलेल्या पुण्यात त्यांना भारतीय क्रिकेटचा आधुनिक महानायक विराट कोहली त्यांना सात या अंकाशी साधर्म्य असलेली वाढदिवसाची अनोखी भेट देत होता. हा योगायोग असला तरी दोन्हीकडचे कर्तुत्व अतिमहान.

INDvsSA : संघातून हाकलंल होतं तरी शेवटी ब्रेक थ्यू त्यानंच मिळवून दिला ना!

योगायोग होणे हे सुद्धा नियतीच्या मनी असावे लागते. पण त्यासाठी अथक प्रयत्न आणि मेहनतीची आणि अंगीअसलेले गुण साकार करण्याची क्षमता असावी लागते म्हणूनच अमिताभ असो वा कोहली आपापल्या क्षेत्रात "विराट' उंची गाठत असतात. पुण्याच्या गहुंजे येथील स्टेडियमवर विराट कोहलीने सातवे द्विशतक करण्याचा विक्रम केला. आणि सात हजार कसोटी धावांचाही टप्पा गाठला. भारतीय क्रिकेटमध्ये सुनील गावसकर यांच्यापासून सचिन तेंडुलकरपर्यंत महान फलंदाज झाले. वीरेंद्र सेहवागसारखा स्फोटक फलंदाज एकेक नवे विक्रम रचणारा फलंदाज आपला ठसा उमटवलेला आहे, पण अगोदर सचिन तेंडुलकर आणि आज सेहवाग यांना द्विशतकाच्या शर्यतीत विराटने त्यांना मागे टाकले. 

Image result for virat kohli and amitabh bachchan

अमिताभ हे स्वतः भारतीय क्रिकेटचे निस्सिम चाहते आहेत. 2011 मध्ये धोनीच्या धुरंधरांनी मुंबईत विश्‍वकरंडक जिंकला तेव्हा अमिताभ यांनी रस्त्यावरून उतरून "जलसा' केला होता. एका सर्वसामान्य भारतीयांप्रमाणे ते रात्रभर अजिंक्‍यपदाचा जल्लोष साजरा करत होते. आज त्यांना 77 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भारतीय क्रिकेटपटूही मागे नसतील परंतु "सात' या अंकाशी साधर्म्य साधणारी विराट कोहलीची शुभेच्छा स्वतः अमिताभ यांच्याही मनात अनंतकाळ रहाणारी ठरेल..


​ ​

संबंधित बातम्या