टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचा संभ्रम पुढील आठवड्यात तरी दूर होणार ?  

टीम ई-सकाळ
Tuesday, 14 July 2020

कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या भवितव्याची चर्चा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आगामी बैठकीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या भवितव्याची चर्चा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आगामी बैठकीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आयसीसीच्या पुढच्या बैठकीची तारीख अद्याप पर्यंत निश्चित झाली नाही. मात्र आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या निश्चिती संदर्भात पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. 

विराट कोहली असलेल्या वर्ल्ड टी -20 संघाचे नेतृत्व हिटमॅन रोहितकडे        

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान आस्ट्रेलिया मध्ये घेण्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सध्याच्या स्थितीनुसार ही स्पर्धा आयोजित करण्यावर आयसीसीने अजून पर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. पण या बैठकीची तारीख निश्चित झाली नसल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले असून, विश्वचषक स्पर्धेचे आयोजन आणि आयसीसीच्या अध्यक्षयीय पदाच्या निवडणुकीचा कोणताही तपशील ठरवण्यात आला नसल्याचे म्हटले आहे. मात्र विश्वचषक स्पर्धेच्या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक झाल्यानंतर तपशील जाहीर करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ENG vs WI : ऐतिहासिक सामन्यात विंडीजचा इंग्लंडवर विजय  

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आयोजनाचा निर्णय देखील, ऑस्ट्रेलिया मध्ये रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या निश्चितीनंतरच घेण्यात येणार आहे. सध्याच्या कोरोना स्थितीमध्ये या स्पर्धेवर रद्द होण्याची टांगती तलवार लटकत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलचे आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान घेण्याचे प्रयत्न सुरु केले होते. तर मागील जून महिन्याच्या सुरुवातीला आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा अंतरिम काळासाठी आयसीसीचे अध्यक्ष झाले असून, त्यांना टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घ्यावा लागणार आहे.                

 


​ ​

संबंधित बातम्या