आयपीएलमध्ये लवकरच महिला पर्व दिसेल, शिखाने व्यक्त केला विश्वास

सुशांत जाधव
Saturday, 1 August 2020

आगामी एक दोन वर्षांत यात आणखी सुधारणेसह  आयपीएल स्पर्धेत महिला युगाला सुरुवात होईल, असा विश्वास शिखाने व्यक्त केलाय.

नवी दिल्ली : आगामी एक-दोन वर्षांत महिला आयपीएल स्पर्धा स्वतंत्ररित्या रंगल्याचे पाहायला मिळेल, असा विश्वास भारतीय महिला सघांची गोलंदाज शिखा पांडे हिने व्यक्त केलाय. यापूर्वी भारतीय महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी 2018 पासून महिला क्रिकेटर्ससाठी खास उपक्रम बीसीसीआयने राबवल्याचे पाहायला मिळाले होते.  2018 च्या हंगामात ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हास यांच्यात प्रदर्शनिय सामना खेळवण्यात आला होता. आयपीएलच्या रिंगणात महिला संघ उतरल्याची ही पहिली वेळ होती. 

फिफा झाली मेहरबान ; 211 देशांना देणार आर्थिक सहाय्य

शिखा पांडेने एएनआयला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये महिला आयपीएलवर भाष्य केले. महिला आयपीएल स्पर्धा देशातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असे शिखाने म्हटले आहे. नव्वदीच्या दशकात टेलिव्हिजनवर महिला क्रिकेटचे सामने पाहण्याची संधी आम्हाला मिळाली नाही. आयपीएलमुळे महिला क्रिकेट घराघरापर्यंत पोहचण्यास मदत होईल. ही गोष्ट महिला क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. क्रिकेटच्या मैदानात उतरण्याचे स्वप्नं पाहणाऱ्या मुलींसाठी ही एक पर्वणी ठरेल, असेही शिखाने म्हटले आहे. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

त्यानंतर 2019 मध्ये यात आणखी थोडा बदल करण्यात आला. वेलोसिटी हा नवीन संघ यात सहभागी झाला आणि  महिला ट्वेंटी20 चॅलेंज थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. आगामी एक दोन वर्षांत यात आणखी सुधारणेसह  आयपीएल स्पर्धेत महिला युगाला सुरुवात होईल, असा विश्वास शिखाने व्यक्त केलाय. यंदाच्या वर्षांत बीसीसीआयने महिला ट्वेंटी20 चॅलेंजमध्ये आणखी एका संघाचा सहभाग केला होता. यंदाच्या आयपीएल हंगामात   चार महिला संघ सात सामने खेळणे अपेक्षित होते. पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नियोजित वेळापत्रक कोलमडले आहे.  


​ ​

संबंधित बातम्या