काय वेळ आली...मोठ्या फरकाने संघ जिंकला म्हणून प्रशिक्षकच निलंबित

वृत्तसंस्था
Tuesday, 5 November 2019

फुटबॉलमध्ये एरवी सूमार कामगिरी झाली किंवा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला की प्रशिक्षकांची हकालपट्टी होत असते, पण अमेरिकेत शालेय फुटबॉलमध्ये मात्र वेगळेच घडले आहे. दणादण गोल करत प्रतिस्पर्धी संघाचा धुव्वा उडवला त्यामुळे विजयी संघाच्या प्रशिक्षकांना एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. रॉब शेवर असे या प्रशिक्षकांचे नाव आहे.

वॉशिंग्टन - फुटबॉलमध्ये एरवी सूमार कामगिरी झाली किंवा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला की प्रशिक्षकांची हकालपट्टी होत असते, पण अमेरिकेत शालेय फुटबॉलमध्ये मात्र वेगळेच घडले आहे. दणादण गोल करत प्रतिस्पर्धी संघाचा धुव्वा उडवला त्यामुळे विजयी संघाच्या प्रशिक्षकांना एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. रॉब शेवर असे या प्रशिक्षकांचे नाव आहे. 

ही घटना गेल्या महिन्याच्या अखेरीस घडली. रॉब शेवर यांच्या प्लेनेज हायस्कूलच्या फुटबॉल संघाने साऊथ शोर या शाळेचा तब्बल 61-13 असा पराभव केला. संघाने केलेल्या 61 गोलांची "शिक्षा' मुख्य प्रशिक्षक शेवर यांना करण्यात आली. 

खेळ हा खिलाडूवृत्तीनेच खेळला पाहिजे. त्यात हार जितलाही तेवढेच महत्व आहे. या शालेय स्पर्धांसाठी "एकांगी गुण पॉलिसी' तीन वर्षांपासून तयार करण्यात आली आहे. खिलाडूवृत्ती जपण्यासाठी हे धोरण आहे. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवायचा परंतु तो 42 गुणांपेक्षा अधिक असू नये असे या धोरणात नमूद करण्यात आले आहे. 

इतकेच नव्हे तर रॉब शेवर यांची "एकांगी गुण समितीस'मोर चौकशीही झाली. त्यांनी आपली बाजू मांडली. पण त्यावर समितीचे समाधान झाले नाही. जर तुमच्याकडे सुरुवातीपासून मोठी आघाडी होती तर तुम्ही राखीव खेळाडूंना का संधी दिली नाही, असे प्रश्‍न समितीने विचारला. 

या नियमाखाली कारवाई झालेले शेवर हे पहिले प्रशिक्षक आहेत. दुबळ्या संघांचे खच्चीकरण होऊ नये म्हणून हा निमय करण्यात आलेला आहे.


​ ​

संबंधित बातम्या