महिंद्रा अडव्हेंचरतर्फे ‘क्लब चॅलेंज’च्या पाचव्या आवृत्तीची यशस्वी सांगता

वृत्तसंस्था
Wednesday, 26 February 2020

महिंद्र अँड महिंद्र लि.तर्फे (एम अँड एम) आज क्लब चॅलेंज’च्या पाचव्या आवृत्तीची यशस्वी सांगता करण्यात आली. यामध्ये देशभरातील 15 ऑफ- रोडिंग क्लबनी सहभागी होत ऑफ- रोडिंग पुरस्कारांसाठी बाजी लढवली. 

बंगळूर : महिंद्र अँड महिंद्र लि.तर्फे (एम अँड एम) आज क्लब चॅलेंज’च्या पाचव्या आवृत्तीची यशस्वी सांगता करण्यात आली. यामध्ये देशभरातील 15 ऑफ- रोडिंग क्लबनी सहभागी होत ऑफ- रोडिंग पुरस्कारांसाठी बाजी लढवली. 

दोन दिवस कालावधीच्या आणि सात अडथळे पार करण्याचे आव्हान देणाऱ्या या कठीण लढतीमध्ये समग्र विजेत्याचे बक्षिस आणि पाच लाख रुपयांची बक्षिसाची रक्कम केरळस्थित क्लब ‘वायानंद जीपर्स’ यांना देण्यात आली. पहिले रनर अप ‘बेंगलोर ऑफ रोड ड्रायव्हर्स असोसिएशन’ (बीओडीओ) यांनी तीन लाख रुपयांची रक्कम जिंकली, तर ‘आर अँड टी ऑफ- रोड क्लब’ यांनी दुसऱ्या क्रमांकाच्या विजेतेपदासह दोन लाख रुपयांची रक्कम जिंकली.

यात सहभागी झालेल्या इतरांमध्ये टीम एक्सएक्सपेंडेब्लेझ क्लब 4*4डी. ओटी, ईस्ट जैनिता अडव्हेंचर मोटरस्पोर्ट, मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ मेघालय, पंजाब ऑफरोडर्स क्लब, केरला अडव्हेंचर स्पोर्ट्स क्लह, व्हर्ज रेसिंग, एक्स्ट्रीम ऑफरोडर्स, 4*4 केआरओसी नॉर्थन इंडिया ऑफरोड क्लब, केटीएम जीपर्स आणि फ्लायव्हील यांचा समावेश होता.

देशभरातील सर्वोत्तम ऑफ- रोडिंग क्लब्सच्या सहभागींनी भारतातील ‘बेस्ट ऑफ रोडिंग क्लब’चे विजेतेपद जिंकण्यासाठी ‘क्लब चॅलेंज’ची लढत दिली. सर्व अडथळे वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीवर भर देणारे होते. 22 फेब्रुवारी 2020 रोजी रात्रीच्या आकर्षक टप्प्यांसह क्लब चॅलेंजची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 फेब्रुवारी 2020 रोजी दिवसाचे टप्पे आयोजित करण्यात आले होते व त्यानंतर बेंगळुरूमध्ये एका शानदार बक्षिस समारंभासह स्पर्धेची सांगता करण्यात आली.

‘डिमॉलिशन डर्बी’ ही अडथळ्यांची प्रमुख शर्यत यावर्षातल्या आव्हानांचाही एक भाग होती, ज्यात ऑफ रोड वाहनांनी भंगारातील गाड्यांमधून वाट काढली. ‘पास द बेटन’ या आणखी एका प्रसिद्ध अडथळ्यामध्ये सर्व प्रकारच्या वाहनांनी रिले पद्धतीने ड्रायव्हिंग करत एका गाडीतून दुसऱ्या गाडीत बेटन देत, अडथळ्यांवर मात करत फिनिशिंग लाइन पार केली. यावर्षी स्ट्रॅप्स ऑफ गॉड, ड्रॅग रेस आणि टग ऑफ वॉर हे अडथळे पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आले होते. 


​ ​

संबंधित बातम्या