रोनाल्डोचा 25 यार्ड अंतरावरून गोल 

वृत्तसंस्था
Sunday, 28 October 2018

मिलान : बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद लढत लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्याविना रंगणार, याची चर्चा फुटबॉल जगतात सुरू आहे. त्याच वेळी रोनाल्डोने आपण युव्हेंटिसकडून खेळत असल्याची आठवण करून देताना 25 यार्ड अंतरावरून जबरदस्त गोल केला. 

रोनाल्डोने दोन गोल करीत युव्हेंटिसची सीरिज "ए'मधील आघाडी भक्कम करण्यात मोलाची कामगिरी केली. त्यांनी एम्पोलीला 2-1 पराजित करीत अन्य संघांना किमान सात गुणांनी मागे टाकले आहे. एम्पोलीने 28 व्या मिनिटास घेतलेली आघाडी विश्रांतीसही राखली होती. 

दहा कोटी युरोची किंमत असलेल्या रोनाल्डोने 25 यार्ड अंतरावर मिळालेल्या किकवर गोल करीत युव्हेंटिसला बरोबरी साधून दिली आणि 20 मिनिटे असताना विजयी गोलही केला. त्याने सलग तिसऱ्या लढतीत गोल केला आहे. काही दिवसांपूर्वीच्या चॅंपियन्स लढतीतून पूर्ण सावरण्यापूर्वीच ही लढत झाली होती, त्यामुळे आव्हान सोपे नव्हते. सर्वजण कौतुक करीत असलेला गोल कसा झाला, हे मला आता आठवत नाही. त्या गोलने आत्मविश्वास उंचावला हे खरे, असे रोनाल्डोने सांगितले. 

डॉर्टमंडची आघाडी घटली 
फ्रॅंकफर्ट ः बायर्न म्युनिकने मेंझला 2-1 असे हरवून बोरुसिया डॉर्टमंडची गुणतक्‍त्यातील आघाडी कमी केली. डॉर्टमंडला भरपाई वेळेत स्वीकारलेल्या गोलमुळे हेर्था बर्लिनविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. बार्यनने सात दिवसांत तीन विजय मिळवत सहाव्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यापूर्वी बायर्नने तीन लढती गमावल्या होत्या. 

ऍटलेटिको माद्रिद अव्वल 
माद्रिद ः ऍटलेटिको माद्रिदने रेयाल सोशिएदादला 2-0 असे हरवून ला लिगामध्ये अव्वल क्रमांक मिळवला. ऍटलेटिको सलग सात सामन्यांत अपराजित आहेत. चॅंपियन्स लीगमधील पराभवातून सावरत माजी विजेत्यांनी विजय मिळविला. त्यांनी बार्सिलोनास एका; तर रेयाल माद्रिदला चार गुणांनी मागे टाकले आहे. 

​ ​

संबंधित बातम्या