चौथ्या कसोटीत इंग्लंड संघातून मॅच विनर बाहेर?

वृत्तसंस्था
Wednesday, 29 August 2018

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडसाठी अष्टपैलू कामगिरी करून दुसरी कसोटी जिंकून देणारा ख्रिस वोक्स खेळण्याची शक्यता कमी आहे.

साउदम्पटन : भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडसाठी अष्टपैलू कामगिरी करून दुसरी कसोटी जिंकून देणारा ख्रिस वोक्स खेळण्याची शक्यता कमी आहे.

ख्रिस वोक्सला दुखापत झाली असून, इंग्लंडला हा झटका समजला जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना उद्यापासून (गुरुवार) सुरु होत आहे. इंग्लंडचा संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर असला तरी भारताकडून कडवी लढत मिळण्याची शक्यता आहे.

इंग्लंडने ख्रिस वोक्सच्या कामगिरीच्या जोरावर लॉर्डस कसोटीत विजय मिळविला होता. वोक्सने शतकी खेळी केली होती आणि चार बळी घेतले होते. त्यामुळे भारताला डावाने पराभव स्वीकारावा लागला होता. वोक्सच्या जांघेत दुखापत झाली असून, तो खेळण्याची शक्यता नाही. त्याने सरावातही सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी इंग्लंड संघात सॅम करनचा समावेश होण्याची शक्यता आहे.


​ ​

संबंधित बातम्या