भारताविरूद्ध खेळून ख्रिस गेल क्रिकेटमधून निवृत्त होणार

वृत्तसंस्था
Wednesday, 26 June 2019

"माझ्या कारकिर्दीचा हा काही शेवट नाही. मी कदाचित अजून एक मालिका नक्कीच खेळेन. आता विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताविरुद्ध मी कदाचित कसोटी मालिका खेळेन.

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल निवृत्त होणार आहे. तसे सूतोवाच त्याने केले आहेत. निवृत्तीबाबत गेल म्हणाला की, "माझ्या कारकिर्दीचा हा काही शेवट नाही. मी कदाचित अजून एक मालिका नक्कीच खेळेन. आता विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताविरुद्ध मी कदाचित कसोटी मालिका खेळेन.

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मी नक्कीच खेळणार आहे. पण ट्वेन्टी-२० मालिकेत मात्र मी खेळणार नाही." भारताविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळून मी निवृत्ती घेईन असे ख्रिस गेलने म्हटले आहे.

दरम्यान, गेलने यंदाचे आयीपएल चांगलेच गाजवले होते. त्याचबरोबर विश्वचषकातही त्याचा बॅटमधून धावा बरसल्या होत्या. त्यामुळे गेलच्या निवृत्तीच्या निर्णयाने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. वेस्ट इंडिजच्या प्रसारमाध्यमांचे व्यवस्थापक फिलीप स्पुनर यांनी ही गोष्ट अधिक स्पष्ट केले की, भारताविरुविरुद्धच्या मालिकेनंतर ख्रिस गेल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या