लॉकडाउनमुळे पत्नी अन् मुलांपासून दूर राहिलेला क्रिकेटर म्हणाला; आता मला ब्रेक हवा!

टीम ई-सकाळ
Wednesday, 24 June 2020

18 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळवण्याचा आयोजकांनी प्लॅन केलाय. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर होण्याच्या एकदिवस अगोदर क्रिकेटरने स्पर्धेतून काढता पाय घेतला आहे.

जमेका : वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलने फायनल ड्राफ्टच्या एकदिवस अगोदर कॅरेबियन प्रीमीयरमधून माघार घेतली आहे. वैयक्तिक कारण सांगत त्याने आगामी स्पर्धेत सहभागी होत नसल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रिडा जगताला मोठा फटका बसला असून संकटजन्य परिस्थितीतून सावरुन स्पर्धेच्या आयोजनाच्या हालचालींना वेग येत आहे. वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौऱ्याला रवाना झाला असताना वेस्ट इंडिजमध्ये रंगणाऱ्या कॅरेबियन प्रीमीयर लीग स्पर्धा खेळवण्याचा विचार सुरु झाला आहे. सरकारच्या परवानगी मिळाल्यानंतर त्रिनिदाद आणि टोबॅगो या ठिकाणी 18 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळवण्याचा आयोजकांनी प्लॅन केलाय. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर होण्याच्या एकदिवस अगोदर गेलने स्पर्धेतून काढता पाय घेतला आहे.  

मदतीसाठी कोर्टवर उतरले अन् जोकोविचसह 'हे' टेनिस स्टार कोरोनाच्या जाळ्यात अडकले

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, 'क्रिस गेलने ईमेलच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लॉकडाउनच्या काळात कुटुंबियांना भेटता आलेले नाही. त्यामुळे आता मला त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी वेळ हवा आहे. गेलची पत्नी आणि मुल ही सेंट किट्स याठिकाणी वास्तव्यास आहेत. लॉकडाउनच्या काळात गेल जमेकामध्ये अडकून होता. त्याला आपल्या मुलांना आणि पत्नीला भेटता आले नाही.लॉकडाउनमधून बाहेर पडल्यानंतर आता त्याला कुटुंबियांसोबत बळ घालवायचा आहे.  40 वर्षीय क्रिस गेलला कॅरेबियन प्रीमीयर लीग (सीपीएल) मधील सेंट लूसिया जाउक्स या संघाने 2020 च्या हंगामासाठी आपल्या ताफ्यात सामील केले होते.

'द्रविड हा सचिन-गांगुलीपेक्षा भारी होता'

कॅरेबिनय लीगमध्ये गेल आतापर्यंत वेगवेगळ्या तीन संघातून खेळताना दिसला आहे. मागील हंगामा तो जमेका थलायवाजकडून खेळला होता. पण 2020 साठी या संघाने त्याला पसंती दिली नाही. या प्रकारानंतर गेलने सहायक प्रशिक्षक रामनरेश सारवानला कोरोनापेक्षा विखारी असल्याची टिका केली होती. यावर अनेक चर्चा रंगत असताना गेलने याप्रकरणी माफीही मागितली होती. जमेका संघातून बाहेर काढण्यात सारवानचा हात असल्याचा आरोप गेलने केला होते. वेस्ट इंडिजकडून 103 कसोटी आणि 301 वनडे सामने खेळलेल्या क्रिस गेलने निवृत्तीची घोषणा करुन पुन्हा आपला निर्णय बदलला होता. त्याच्या या निर्णयाचीही चांगलीच चर्चा रंगली होती. 


​ ​

संबंधित बातम्या