तुम्ही वटवाघूळ कसं काय खाता? शोएब अख्तरने चीनवर संतापला

वृत्तसंस्था
Monday, 16 March 2020

करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीसाठी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने चीनला जबाबदार धरले आहे. 

सगळं जग सध्या कोरोना व्हायरसच्या भीतीखाली आहे. जगभरात कितीतरी लोकांनी त्यामुळे प्राण गमावले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रसाराला पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोयब अख्तर याने चिनला जबादार ठरवले आहे. 

मोठी बातमी : कोरोनामुळे IPL स्पर्धा पुढे ढकलली; 'या' तारखेला होणार...

देश विदेशात कोरोनामुळे कितीरी स्पर्धा रद्द काराव्या लागल्या आहेत, लोक त्यांच्या घरामध्ये बसून राहावं लागतंय, या सगळ्या परिस्थीतीला चिन जबाबदार आहे असं शोयबने त्याच्या युटूब चॅनेलवर शेअर केलेल्या एका व्हिडीओ मध्ये राग व्यक्त  केला आहे. "मला कळत नाही की तुम्ही वटवाघूळ कसं काय खाता? त्याचं रक्त का पिता? त्यामुळे तुम्ही सगळ्या जगाला धोक्यात टाकलं आहे. यामुळेचजगात धोकादायक व्हायरस पसरतोय.खरोखरच मला हे समजत नाहीय की, तुम्ही वटवाघुळ, कुत्रे आणि मांजरी कशा खाऊ शकता? माझा संताप होतोय” असं अख्तने सुनावलं आहे. 

INDvsSA : कोरोनाची दहशतीमुळे IPL नंतर भारत-दक्षिण आफ्रिका मालिकाही रद्द!

त्यानंतर त्याने खुलासा देखील केला की, "सगळ्या जगाला आता धोका निर्माण झाला आहे, अर्थव्यावस्थेवर खूप वाईच प्रभाव पडला आहे, सगळं जग कैदेत अडकत चाललं आहे.   मी चीनी लोकांच्या विरोधात नाहीये, मी समजू शकतो की ते त्यांच कल्चर असेल पण यात कोणाचाच फायदा नाही. या साठी काही कायदे असायला हवेत, तुम्हा असं काहीही नाही खाऊ शकत"

जगभरात सगळे उद्योग कोरोनाच्या भीतीने ठप्प झाले आहेत. लोकांच्या प्रवास करण्यावर तसेच मोठ्या आयोजनांवर बंधन घालण्यात येत आहेत. कोरोनामुळे त्याबरोबरत जगभरात शेकडो लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. 

 


​ ​

संबंधित बातम्या