पदके कमी झाली, तर प्रशिक्षकांची पगार कपात

मुकुंद पोतदार
Tuesday, 26 February 2019

बीजिंग :चीनने टोकियो ऑलिंपिकमध्ये टेबल टेनिसमधील वर्चस्व कायम राहावे म्हणून जालीम उपाय अवलंबिला आहे. पदके अपेक्षेनुसार मिळाली नाहीत, तर प्रशिक्षकांचा पगार कापण्याबरोबरच पदावनती करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला. 

जागतिक क्रमवारीत पुरुष, महिला आणि सांघिक अशा तिन्ही गटांत चीनचे खेळाडू आघाडीवर आहेत. गेल्या तीन ऑलिंपिकमध्ये सर्व 12 सुवर्णपदके चीनच्या खात्यात जमा आहेत. चिनी टेबल टेनिस संघटनेने 2017 मध्ये मुख्य प्रशिक्षक लिऊ गुओलीयांग यांना हटविले. या निर्णयाच्या निषेधार्थ तीन प्रमुख पुरुष खेळाडूंनी मायदेशातील स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यावेळी वाद उघड झाला. 

लिऊ यांचा लौकिक मोठा आहे. गेल्या हिवाळ्यात त्यांना या पदावर पुन्हा नेमण्यात आले. त्यांनी नुकताच स्वतःचा उल्लेख "कमांडर-इन-चीफ' असा केला. ते आता चिनी टेबल टेनिस संघटनेचे प्रमुख आहेत. टोकियोत वर्चस्व राखण्याचा निर्धार व्यक्त करून ते म्हणाले, की कामगिरी मूल्यमापनाची नवी पद्धत अवलंबिण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या हाताखालील एकाही प्रशिक्षकाला गुण कमी पडले तर मी स्वतः एक वर्ष पगार घेणार नाही. प्रशिक्षकांच्या खिशाला सुद्धा असाच फटका बसेल. त्यांना खालचे पद घ्यावे लागेल. यंदाच्या वर्षातील सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील कामगिरीनुसार मूल्यमापन केले जाईल. 

लिऊ 43 वर्षांचे आहेत. त्यांनी संघाची आगेकूच आणि प्रगती व्हावी म्हणून लष्कराप्रमाणे धोरण अवलंबिले आहे. त्यांच्या कार्यकाळातील प्रशिक्षकांसाठी पुरस्कार-कारवाईची गुणांवर आधारित पद्धत इतिहासातील सर्वांत कडक असल्याचा उल्लेख "झिन्हुआ' या वृत्तसंस्थेने केला आहे. 

यजमान जपानचा धोका 
टोकियो ऑलिंपिकमध्ये चीनला सांघिक प्रकारात जपानचा धोका असेल. जपान यजमान असल्यामुळे त्यांच्या आव्हानाचा धोका वाढल्याचा इशारा प्रमुख चिनी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

​ ​

संबंधित बातम्या