INDvsSA : त्याचं नेहमीचंय, मला डिवचायला आवडतं त्याला! : पुजारा

वृत्तसंस्था
Friday, 11 October 2019

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पुजाराने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राबद बोलताना तो म्हणाला की तो माझी एकाग्रता ढळविण्याचा प्रयत्न नेहमीच करतो हे ठाऊक आहे.

पुणे : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पुजाराने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राबद बोलताना तो म्हणाला की तो माझी एकाग्रता ढळविण्याचा प्रयत्न नेहमीच करतो हे ठाऊक आहे.

INDvsSA : दडपण? मला नाही वाटतं मयांकला हा शब्द माहीत आहे

तो म्हणाला, "रबाडा आक्रमक गोलंदाज आहे. फलंदाजांना उद्देशून शेरेबाजी करण्यास त्याला नेहमीच आवडते. तो मला काय म्हणाला हे आता आठवत नाही. तो माझी एकाग्रता ढळविण्याचा प्रयत्न नेहमीच करतो हे ठाऊक आहे. तसे पाहिले तर कोणताही गोलंदाज हेच करतो. त्यामुळे ते काय म्हणतात त्याकडे मी दुर्लक्ष करतो. तुम्ही झोनमध्ये गेलात तर तुम्हाला फार काही ऐकूच येत नाही."

भारताचा सलामीवीर मयांक अगरवाल याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात शतक झळकावले. याबरोबरच मयांक हा सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग अशा दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत विराजमान झाला. मयांकने 195 चेंडूंत 108 धावा केल्या. विशाखापट्टणमला पहिल्या कसोटीत त्याने 215 धावा फटकावल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतके काढणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला.

आता जगण्यासारखं उरलंय तरी काय?

दरम्यान तो येणार, कोसळणार अशी नुसती आवईच उठली. प्रत्यक्षात गहुंजेच्या मैदानावर पाऊस नाही पण, धावांच्या सरी नक्कीच बरसल्या. संथ फलंदाजीतही मयांक अगरवालचे सलग दुसरे शतक आणि चेतेश्वर पुजारा,  कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात गुरुवारी पहिल्या  दिवस अखेरीस 3 बाद 273 धावा केल्या.


​ ​

संबंधित बातम्या