शास्त्रीजी, तुम्ही कॉमेंट्री चांगली करता तेच करा : चेतन चौहान

वृत्तसंस्था
Monday, 17 September 2018

शास्त्रींना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पदावरून हटविले पाहिजे. शास्त्री उत्तम समालोचन करतात, त्यांनी तेच करावे. भारतीय संघाने चांगली कामगिरी करायला हवी होती. दोन्ही संघ तुल्यबळ होते. भारतीय संघ इंग्लंडच्या शेपटाला गुंडाळण्यात अपयशी ठरले.

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर टीकेचे धनी बनत असलेले मार्गदर्शक रवी शास्त्री यांच्यावर माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी जहरी टीका करत शास्त्री समालोचन (कॉमेंट्री) चांगली करतात, त्यांनी तेच करावे असे म्हटले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला 1-4 असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर खेळाडूंच्या कामगिरी व प्रशिक्षकांवर जोरदार टीका झाली. विराट कोहली वगळता एकही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. तर, शास्त्रीच्या प्रशिक्षकपदावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. चेतन चौहान यांनी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी शास्त्रींना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. 

चौहान म्हणाले, की शास्त्रींना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पदावरून हटविले पाहिजे. शास्त्री उत्तम समालोचन करतात, त्यांनी तेच करावे. भारतीय संघाने चांगली कामगिरी करायला हवी होती. दोन्ही संघ तुल्यबळ होते. भारतीय संघ इंग्लंडच्या शेपटाला गुंडाळण्यात अपयशी ठरले. विराटच्या नेतृत्वाखाली परदेशात गेलेला हा संघ सर्वोत्तम संघ होऊच शकत नाही. 1980 मध्ये परदेशात गेलेला संघ सर्वोत्तम होता. आशिया करंडकात युवा खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.  

संबंधित बातम्या