इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये चेल्सी संघाचा क्रिस्टल पॅलेसवर रोमांचक विजय  

टीम ई-सकाळ
Wednesday, 8 July 2020

चेल्सी संघाने गुणतालिकेत 60 अंक मिळवत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) फुटबॉल स्पर्धेत चेल्सी संघाने क्रिस्टल पॅलेस संघावर 3 - 2 ने विजय मिळवला. त्यामुळे चेल्सी संघाने गुणतालिकेत 60 अंक मिळवत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर एवर्टनचा संघ 42 अंकांसह 14 व्या स्थानावर आहे.    

ऐतिहासिक सामन्यापूर्वी क्रिकेटपटूंचे ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ ला समर्थन  

चेल्सी आणि क्रिस्टल पॅलेस यांच्यात झालेल्या सामन्यात, चेल्सी संघातील ऑलिव्हर गिराऊडने खेळाच्या सुरवातीलाच 6 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला. त्यानंतर ख्रिस्टिअन पुलिसिकने 27 व्या मिनिटाला दुसरा गोल करत चेल्सी संघाला बढत मिळवून दिली. व त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या सत्रात टॅमी अब्राहमने 71 व्या मिनिटाला तिसरा गोल नोंदवला. तत्पूर्वी क्रिस्टल पॅलेसच्या विलफ्राईड जाहने 34 व्या मिनिटाला गोल केला व त्यानंतर ख्रिस्टिअन बेन्टेकने दुसऱ्या सत्रातील 72 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. तसेच लिसेस्टर सिटी आणि आर्सेनल यांच्यातील सामना अनिर्णित राह्ल्यामुळे चेल्सी संघाने क्रमवारीत बढत मिळवत  तिसरे स्थान प्राप्त केले आहे.         

जेसन होल्डर अजूनही जागतिक क्रिकेटमधील सर्वात अंडररेटेड खेळाडू - सचिन तेंडुलकर 

दरम्यान, ईपीएल स्पर्धेच्या क्रमवारीत लिवरपूलच्या संघाने 33 सामन्यांत सर्वाधिक 89 गुण मिळवले असून, लिवरपूल पहिल्या स्थानावर कायम आहे. तर, मँचेस्टर सिटी संघाचे 33 सामन्यांत 66 गुण झाले असून, तो आता दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर चेल्सी संघाने 34 सामन्यांमध्ये 18 विजय मिळवत 60 अंक प्राप्त केल्याने तिसरे स्थान मिळवले आहे. व लिसेस्टर सिटी आणि आर्सेनल यांच्यात झालेला सामना ड्रॉ झाल्याने तिसऱ्या नंबरवर असणारा लिसेस्टर सिटी संघ 59 अंकांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. आणि मँचेस्टर युनायटेड 55 अंकांसह पाचव्या स्थानावर आहे.     

       


​ ​

संबंधित बातम्या