चेल्सीचे गोलरक्षकाला 6 अब्ज 33 कोटी रुपये

वृत्तसंस्था
Thursday, 9 August 2018

चेल्सीने आगामी मोसमापासून गोलरक्षक थिबाऊत कॉर्टाईस याला निरोप देण्याचे ठरवले आहे. त्याच्याऐवजी ऍथलेटिक बिल्बाओचा गोलरक्षक केपा अरिझबॅलागो याला 7 कोटी 16 लाख स्टर्लिंग पौंड (सुमारे 6 अब्ज 33 कोटी रुपये) दिल्याचे समजते. गोलरक्षकासाठी मोजलेली ही सर्वाधिक रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. 

लंडन : चेल्सीने आगामी मोसमापासून गोलरक्षक थिबाऊत कॉर्टाईस याला निरोप देण्याचे ठरवले आहे. त्याच्याऐवजी ऍथलेटिक बिल्बाओचा गोलरक्षक केपा अरिझबॅलागो याला 7 कोटी 16 लाख स्टर्लिंग पौंड (सुमारे 6 अब्ज 33 कोटी रुपये) दिल्याचे समजते. गोलरक्षकासाठी मोजलेली ही सर्वाधिक रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. 

लिव्हरपूलने ब्राझीलचा गोलरक्षक ऍलीसन याच्यासाठी 6 कोटी 69 लाख स्टर्लिंग पौंड (सुमारे 5 अब्ज 91 कोटी 48 लाख रुपये) मोजले होते. यापेक्षा जास्त रकमेचा करार चेल्सीने केपाबरोबर केला आहे. त्याची आता वैद्यकीय चाचणी होईल. त्यानंतर या करारावर शिक्कामोर्तब होईल. 

गेल्या मोसमाच्या मध्यास रेयाल माद्रिदने केपाबरोबरील कराराची रक्कम ठरवली होती. त्याची वैद्यकीय चाचणीही घेतली होती; पण रेयालचे तत्कालीन मार्गदर्शक झिनेदीन झिदान यांनी मोसम सुरू असताना संघात बदल करण्यास नकार दिला होता आणि कराराची पूर्तता झाली नाही. केपा वयाच्या दहाव्या वर्षापासून ऍथलेटिक बिल्बाओ संघासोबत होता. तो 30 ला लिगा लढती खेळला आहे.  
 

संबंधित बातम्या