आयपीएलच्या अमीराती मधील आयोजनास केंद्र सरकारचा हिरवा कंदील

टीम ई-सकाळ
Sunday, 2 August 2020

केंद्र सरकारने आयपीएलच्या अमीराती मधील आयोजनास हिरवा कंदील दिला आहे. 

ऑस्ट्रेलियात नियोजित यावर्षीची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या आयोजनाची तयारी सुरू करत, यंदाची स्पर्धा भारताबाहेर अमीरातीत खेळवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने आयपीएलच्या अमीराती मधील आयोजनास हिरवा कंदील दिला आहे. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

आयसीसीची टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यामुळे आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग याआधीच मोकळा झाला होता. मात्र सध्याच्या स्थितीत देशात आयपीएलची स्पर्धा घेणे अशक्यप्राय वाटत असल्याने, बीसीसीआयने यंदाचा आयपीएल सामन्यांचा तेरावा हंगाम अमिरातीत खेळवण्याचा निर्णय घेतला होता. व त्यासाठी बीसीसीआयने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने बीसीसीआयच्या या मागणीला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत यंदाची आयपीएल स्पर्धा अमिरातीत होण्याचे निश्चित झाले आहे. 

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

बहुप्रतिक्षित आयपीएल स्पर्धेच्या गव्हर्निंग कौन्सिलची आज बैठक पार पडली असून, या बैठकीत आयपीएल स्पर्धेसंदर्भातील अंतिम आराखड्याबाबत चर्चा झाली.  शिवाय यावेळच्या आयपीएल स्पर्धेसाठी VIVO हीच मुख्य स्पॉन्सर म्हणून कायम राहणार असल्याचे कळते.  


​ ​

संबंधित बातम्या