CPL 2020 : अपराजित संघ फायनल गाठणार की टॉपर गड्यांची टीम?

सुशांत जाधव
Tuesday, 8 September 2020

नाइट रायडर्सचा संघ साखळी फेरीतील गुणतालिकेत अव्वलस्थानी असला तरी साखळी सामन्यापर्यंत फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये जमेकाच्या गड्यांनी सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे.

त्रिनिदाद : वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेली कॅरेबियन लीग स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. ब्रायन लारा स्टेडियमवर ट्रिनबागो नाइट रायडर्स आणि जमेका तलावाज यांच्यात फायनलमध्ये जाण्यासाठी टक्कर होतेय. नाइट रायडर्सच्या संघाने स्पर्धेत एकही सामन्यात पराभव पत्करलेला नाही. दुसरीकडे जमेकाचा संघ काटावर पास होऊन सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. त्यामुळे दोन्ही संघात पोलार्डच्या नेतृत्वाखालील संघ वर्चढ दिसतोय. क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ असल्यामुळे बाजी पलटण्यात जमेका यशस्वी ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.नाइट रायडर्सच्या संघात भारताचा प्रवीण तांबेसह अनेक दिग्ज असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध खेळणे जमेका संघासाठी मोठी कसोटी असणार आहे.  

कॅरेबियन लीगमध्ये भारताच्या प्रवीण तांबेची हवा; एकदा व्हिडिओ पाहाच

नाइट रायडर्सचा संघ साखळी फेरीतील गुणतालिकेत अव्वलस्थानी असला तरी साखळी सामन्यापर्यंत फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये जमेकाच्या गड्यांनी सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे.  जमेकाची मदार ही ग्लेन फिलिप्सवर असेल त्याने स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. 10 सामन्यातील 9 डावात त्याने 314 धावा केल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही अव्वलस्थानी जमेकाचा गडीच आहे. त्याने 10 सामन्यात सर्वाधिक 15 विकेट्स मिळवल्या आहेत.  

CPL 2020 : कोलांड्या उड्या मारुन सिलेब्रेशन! पाहा केविन-राशिद यांच्यातील खतरनाक 'टशन' (VIDEO) 

जमेकाचा संघ : जर्मेन ब्लॅकवूड, ग्लेन फिलिप्स (यष्टीरक्षक), चॅडविक वॉल्टन, रोवमन पॉवेल (कर्णधार), आंद्रे रसेल, निकोलस किर्टन, कार्लोस ब्रेथवेट, वीरासॅमी पेरम्युअल, मुजीब उर रेहमान, संदीप लिमिचाने, फिडेल एडवर्ड, नकृमाह बोनेर, असिफ अली, रामल लिविस, प्रीस्टन मॅकविन, ओशेन थॉमस, रियान पेरसैद.

ट्रिनबागो नाइट रायडर्स संघ : टिओन वेबस्टर, अमिर जंगू, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), ड्वेन ब्रावो,  केरन पोलार्ड (कर्णधार),  सिकंदर रझा, अकेल हुसैन, अली खान, फवाद अहमद, प्रवीण तांबे, अँड्रसन फिलिप, ड्वेने ब्रावो, लेंडन सीमन्स, सुनील नरेन, कॉलीन मुन्रो, खरी पियरे, जयदेन सेल. 


​ ​

संबंधित बातम्या