मुन्रोचं अर्धशतक; पोलार्डचा धमाका! नाइट रायडर्सचा सलग सातवा विजय

सुशांत जाधव
Wednesday, 2 September 2020

 मुन्रोने धमाकेदार खेळ दाखवला. त्याने 54 चेंडूत 65 धावा केल्या. अखेरच्या पाच षटकात मुन्रो पोलार्ड जोडीने 71 धावांची भागीदारी रचली.

कॅरेबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) स्पर्धेत त्रिनबागो नाइट राइडर्स (Trinbago Knight Riders) ने सलग सातवा सामना जिंकत विजयी धडाका कायम ठेवलाय. मंगळवारी झालेल्या सामन्यात त्यांनी जमेकाच्या संघाला (Jamaica Tallawahs) ला 19 धावांनी पराभूत केले. आतापर्यंतच्या स्पर्धेत  त्रिनबागो नाइट राइडर्सने एकही सामना गमावलेला नाही. 7 विजयासह संघाच्या नावे 14 गुण असून ते गुणतालिकेत सुरुवातीपासूनच आघाडीला आहेत.  

तब्बल 150 दिवसानंतर विराटने सहकाऱ्यांसोबत केली फटकेबाजी

त्रिनबागो नाइट राइडर्सचा पुढचा सामना  सेंट कीट्स अँड नेविस पॅट्रियॉट्सविरुद्ध रंगणार आहे. त्रिनबागो नाइट रायडर्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी जमेकासमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले होते. निर्धारित 20 षटकात 165 धावांपर्यंत मजल मारता आली. मुन्रोने या सामन्यात लक्षवेधी खेळी केली. सलामीला आलेल्या सुनील नरेनने संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. त्याने 11 चेंडूत 29 धावा कुटल्या. त्यानंतर मुन्रोने धमाकेदार खेळ दाखवला. त्याने 54 चेंडूत 65 धावा केल्या. अखेरच्या पाच षटकात मुन्रो पोलार्ड जोडीने 71 धावांची भागीदारी रचली. या दोघांच्या खेळीमुळे संघाने निर्धारित 20 षटकात 184 धावा केल्या.   

CPL 2020: पोलार्डची 9 गगनचुंबी षटकारांची बरसात -VIDEO

या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या जमेकाची सुरुवात खराब झाली. धावफलकावर अवघ्या 14 धावा असतान सलामी जोडी माघारी परतली. मध्यफळीत आंद्रे रसेलने 23 चेंडूत 50 धावांची खेळी करत संघाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र त्याला दुसऱ्या बाजुने साथ न मिळाल्याने जमेकाच्या पदरी निराशा आली.  कॉलिन मुन्रोला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.   भारत भारत

 


​ ​

संबंधित बातम्या