CPL 2020 : गोलंदाजाच्या नौटंकीनंतर ब्रावोने दाखवला इंगा (Video)

सुशांत जाधव
Friday, 11 September 2020

सेंट लिसिया झूक्स संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना 20 धावांच्या आताच ट्रिनबागो नाइट रायडर्सचे दोन गडी माघारी परतले होते. त्यानंतर मैदानात उतरलेल्या डॅरेन ब्रावोने सलामीवीर सिमन्सला उत्तम साथ देत संघाचा डाव सावरला. नाइट रायडर्सच्या डावातील 14 व्या षटकात ब्रावो आणि प्रतिस्पर्धी संघातील फिरकीपटू ग्लेन यांच्यात खुण्णस पाहायला मिळाली.

CPL 2020 : कॅरेबिनय लीगच्या आठव्या हंगामात ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले. साखळी सामन्यातील 10 पैकी 10 लढती जिंकल्यानंतर सेमी फायनल आणि फायनलमध्ये दिमाखदर खेळ करत त्यांनी चौथ्यांदा जेतेपदावर नाव कोरले. आतापर्यंत या लीगमध्ये सर्वाधिकवेळा जेतेपद मिळवण्याचा पराक्रम नाइट रायडर्स संघाने करुन दाखवला. सेंट लुसिया झूक्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात नाइट रायडर्स संघाकडून सलामीवीर लेंडल सिमन्स (84) आणि डॅरेन ब्रावो (58) दोघांनी अर्धशतकी खेळी करत संघाच्या विक्रमी विजयात मोलाचे योगदान दिले.  

 CPL 2020 : यंदा 'लुंगी डान्स' नाय...पण शाहरुखने जंगी सेलिब्रेशन केलेच!  

सेंट लिसिया झूक्स संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना 20 धावांच्या आताच ट्रिनबागो नाइट रायडर्सचे दोन गडी माघारी परतले होते. त्यानंतर मैदानात उतरलेल्या डॅरेन ब्रावोने सलामीवीर सिमन्सला उत्तम साथ देत संघाचा डाव सावरला. नाइट रायडर्सच्या डावातील 14 व्या षटकात ब्रावो आणि प्रतिस्पर्धी संघातील फिरकीपटू ग्लेन यांच्यात खुण्णस पाहायला मिळाली. दुसरा चेंडू फेकताना ग्लेनने विचित्र हावभाव करत ब्रावोचं लक्षविचलित करण्याचा प्रयत्न केला. चेंडू न फेकता तो माघारी गेला. आणि हा चेंडू त्याने पुन्हा फेकला. ब्रावोने या चेंडूला उत्तुंग टोलावत हिशोब चुकता केला. षटकार खेचल्यानंतर त्याने ग्लेनच्या हावभावाची पुनरावृत्ती ब्रावोने करुन दाखवली.

ट्रिनबागो नाइट रायडर्सने फायनल रात्रही गाजवली, विक्रमी चौकारसह चॅम्पियन!

या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओला चांगलीच लोकप्रियताही मिळत आहे यावर अनेक प्रतिक्रियाही उमटताना दिसते. याव्यतिरिक्त अंतिम सामन्यातील अर्धशकी खेळीसह यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फंलदाजामध्ये ब्रावोने आपली विशेष छाप सोडली आहे. डॅरेन ब्रावोने 12 सामन्यातील 9 डावात 297 धावा केल्या असून तो  सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अंतिम सामन्यात 84 धावांची फटकेबाजी करणारा सिमन्स या यादीत अव्वलस्थानी आहे. त्याने 11 सामन्यातील 11 डावात 356 धावा केल्या असून ग्लेन फिलिप्स 11 सामन्यातील 10 डावातील 316 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 


​ ​

संबंधित बातम्या