CPL 2020 : सेमी फायनलच्या लढती ठरल्या, कोण-कोणाविरुद्ध भिडणार?

सुशांत जाधव
Monday, 7 September 2020

या स्पर्धेतील अंतिम सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियवरच रंगणार आहे. 10 सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेसात वाजता मेगा फायनलमध्ये कोण खेळणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल. 

वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन लीग स्पर्धेतील सेमीफायनलमधील संघ पक्के झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या प्रत्येकी संघाच्या दहा-दहा सामन्यानंतर बारबाडोस ट्रायडेंट्स आणि सेंट किस्ट अँण्ड नेविस पॅट्रियटचा खेळ साखळी सामन्यातच खल्लास झाला. दोन्ही संघ अनुक्रमे 3 आणि 1 सामना जिंकत 6 आणि 3 गुणासह पाचव्या क्रमांकावर राहिले. 

चुकीला माफी नाही! महिला अधिकाऱ्याला चेंडू लागल्यानंतर जोकोविचला ठरवले अपात्र (Video)

कॅरेबियन लीगच्या यंदाच्या हंगामात ट्रिनबागो नाइट रायडर्सने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. त्यांनी 10 पैकी 10 सामने जिंकून 20 गुण मिळवत अव्वल स्थान शेवटपर्यंत कायम ठेवले. स्पर्धेतील साखळी सामन्यातील अपराजित संघ गुणतालिकेत 7 गुणासह चौथ्या स्थानावर असलेल्या जमेका तलावाज विरुद्ध पहिली सेमीफायनल खेळणार आहे. 8 तारखेला  त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. यात विजयी संघ फायनलमध्ये प्रवेश करेल.

आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर...

दुसऱ्या सेमीफायनल सामनाही याच मैदानात रंगणार असून गयाना अमेझॉन वॉरियर्स आणि सेंट लुसिया झूक्स हे दोन संघ फायनलमध्ये धडक मारण्यासाठी प्रयत्न करतील. कॅरेबियन लीगमधील सेमीफायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास 9 सप्टेंबर या राखीव दिवशी सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियवरच रंगणार आहे. 10 सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेसात वाजता मेगा फायनलमध्ये कोण खेळणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल. 


​ ​

संबंधित बातम्या