CPL 2020 : यंदा 'लुंगी डान्स' नाय...पण शाहरुखने जंगी सेलिब्रेशन केलेच!

सुशांत जाधव
Friday, 11 September 2020

2019 च्या हंगामात शाहरुखच्या संघाने गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहत सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. पण बारबाडोस ट्रायडेंट्सने त्यांना पराभूत करत फायनल गाठली आणि मारलीही. (जिंकली) यंदाच्या वर्षी संघ भलत्याच तोऱ्यात दिसला. प्रेक्षकांसह शाहरुखच्या अनुपस्थितीत संघाने अपराजित कामगिरीसह नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. शाहरुखने आपल्या संघाची विक्रमी कामगिरी टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाहरुख  यंदाच्या हंगामात संघासोबत दिसला नाही. पण

त्रिनिदाद : ब्रायन लारा स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात डॅरेन ब्रोवोच्या चौकारासह शाहरुख खानच्या कॅरेबियन लीगमधील ट्रिनबागो नाइटराइडर्स संघाने चौथ्यांदा बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या आठ हंगामात सर्वाधिक वेळा चॅम्पियन ठरण्याचा विक्रम या संघाने आपल्या नावे केला आहे. गतवर्षीच्या हंगामात शाहरुख खान संघासोबत होता. संघाच्या दमदार कामगिरीनंतर संघातील खेळांडूसोबत लुंगी डान्स... गाण्यावर थिरकत तो विजयाचं सेलिब्रेशन करतानाही पाहायला मिळाले.पण मागील वर्षी संघाला जेतेपदावर नाव कोरण्यात अपयश आले. 

ट्रिनबागो नाइट रायडर्सने फायनल रात्रही गाजवली, विक्रमी चौकारसह ठरले चॅम्पियन!

2019 च्या हंगामात शाहरुखच्या संघाने गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहत सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. पण बारबाडोस ट्रायडेंट्सने त्यांना पराभूत करत फायनल गाठली आणि मारलीही. (जिंकली) यंदाच्या वर्षी संघ भलत्याच तोऱ्यात दिसला. प्रेक्षकांसह शाहरुखच्या अनुपस्थितीत संघाने अपराजित कामगिरीसह नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. शाहरुखने आपल्या संघाची विक्रमी कामगिरी टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाहरुख  यंदाच्या हंगामात संघासोबत दिसला नाही. पण त्याने अनोख्या प्रकारे सेलिब्रेशन करत संघासोबत असल्याचे दाखवून दिले. त्याने  टेलिव्हिजनवर संपूर्ण  सामना तर पाहिलाच पण यावेळी त्याने सेल्फी विथ टिमचाही आनंद घेतला. टेलिव्हिजन स्किनसोबत दिसणाऱ्या संघाच्या विजयी दृश्यांसोबत सेल्फी घेतल्याचे पाहायला मिळाले. ट्विटरच्या माध्यमातून त्याने हा फोटो शेअर करत संघाचे अभिनंदन केल्याचे पाहायला मिळाले. 

कॅरेबियन लीगमध्ये हा भारतीय ठरला लक्षवेधी

अंतिम सामन्यात 154 धावांचा पाठला करणाऱ्या पोलार्डच्या नेतृत्वाखालील शाहरुखच्या संघाने 8 गडी राखून सामना सहज खिशात घातला. सलामीवीर लेंडन सिमन्सने 49 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 84 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने टी. वेबस्टर (5) आणि टिम सेफर्ट (4) धावा करुन परतल्यानंतर डॅरेन ब्रावोने 47 चेंडूत नाबाद 58 धावांची खेळी केली. यात त्याने 2 चौकार आणि 6 षटकार खेचले.
 


​ ​

संबंधित बातम्या