CPL2020: सेमी फायनलची वेळ ठरली! कोण-कोणाविरुद्ध भिडणार?

सुशांत जाधव
Friday, 4 September 2020

गुणतालिकेत अव्वल असणारा संघ गुणतालिकेतील चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघासोबत पहिल्या सेमीफायनलमध्ये भिडेल. तर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेला संघ आणि तिसऱ्या स्थानावरील संघात दुसरी सेमीफायनल खेळवली जाईल.

वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन लीगच्या यंदाच्या हंगामातील सेमीफायनल सामन्याच्या वेळा निश्चित झाल्या आहेत. 8 सप्टेंबर रोजी पहिली सेमीफायनल त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता रंगणार आहे. याच मैदानात दुसरी सेमीफायनल भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्रीनंतरच्या 3 वाजता रंगणार आहे.

CPL2020 : सामन्यात पाऊस अन् पावसात तो धावला! (Video)  

गुणतालिकेत अव्वल असणारा संघ गुणतालिकेतील चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघासोबत पहिल्या सेमीफायनलमध्ये भिडेल. तर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेला संघ आणि तिसऱ्या स्थानावरील संघात दुसरी सेमीफायनल खेळवली जाईल. सेमीफायनलच्या सामन्यासाठी 9 सप्टेंबर हा राखीव दिवस ठेवण्यात आला असून या सामन्यातील विजेते 10 सप्टेंबर रोजी फायनलमध्ये एकमेकांसोबत खेळताना दिसतील. अंतिम सामना देखील ब्रायन लारा स्टेडियवरच नियोजित आहे. 

CPL2020: हेटमायरसह निकोलस-पोलार्ड ठरताहेत लक्षवेधी

सध्याच्या घडीला (स्पर्धेतील 25 व्या सामन्यानंतर) त्रिनबगो नाइट रायडर्सचा संघ आठपैकी आठ सामन्यातील विजय मिळवून 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुयाना अमेझॉन वॉरियर्सने 9 पैकी 5 सामन्यातील विजयासह 10 गुण कमावले आहेत. या यादीत सेंट लुसिया झुक्स 8 पैकी 5 सामन्यातील विजयासह तिसऱ्या तर जमेका तलावाज 3 सामन्यातील विजयासह एका अनिर्णित सामन्यामुळे 7 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. बारबाडोस ट्रिडेंटस 8 पैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत तर सेंट किट्स अँड पेट्रियट्सने 9 पैकी केवळ 1 सामनाच जिंकला आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या