CPL2020 : सिमन्सच्या खेळीमुळे ट्रिनबागो नाइट रायडर्सचा फायनलमध्ये प्रवेश   

टीम ई-सकाळ
Tuesday, 8 September 2020

कॅरेबियन लीग स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्यात ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.

कॅरेबियन लीग स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्यात ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. ट्रिनबागो नाइट रायडर्स आणि जमेका तलावाज यांच्यात आज झालेल्या सेमी फायनल सामन्यात ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाने 9 विकेट्सनी जोरदार विजय मिळवला. ब्रायन लारा स्टेडियमवर ट्रिनबागो नाइट रायडर्स आणि जमेका तलावाज यांच्यात फायनलमध्ये जाण्यासाठी झालेल्या सामन्यात, ट्रिनबागो नाइट रायडर्सच्या सिमन्सने अर्धशतकी खेळी साकारली. त्यामुळे ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाने या सामन्यात सहजरित्या विजय मिळवत, अंतिम फेरी गाठली आहे. 

कॅरेबियन लीगमध्ये भारताच्या प्रवीण तांबेची हवा; एकदा व्हिडिओ पाहाच

ट्रिनबागो नाइट रायडर्स आणि जमेका तलावाज यांच्यात झालेल्या सामन्यात जमेका तलावाजने प्रथम फलंदाजी करत 7 गड्यांच्या मोबदल्यात 107 धावा केल्या होत्या. जमेका तलावाजच्या बॉनरने सर्वाधिक 41 धावा केल्या. तसेच पॉवेल 33 धावा केल्या. त्यानंतर जमेका तलावाजने केलेल्या 107 धावांचा पाठलाग करताना, ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाचा सलामीवीर नरेन 4 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर सिमन्स 54 आणि वेबस्टर 44 यांनी केलेल्या भागीदारीमुळे ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाने 1 गडी गमावत 111 धावा केल्या.      

CPL 2020 : कोलांड्या उड्या मारुन सिलेब्रेशन! पाहा केविन-राशिद यांच्यातील खतरनाक 'टशन' (VIDEO)               

यापूर्वी नाइट रायडर्सच्या संघाने स्पर्धेत एकही सामन्यात पराभव पत्करलेला नाही. दुसरीकडे जमेकाचा संघ काटावर पास होऊन सेमीफायनलमध्ये पोहचला होता. नाइट रायडर्सचा संघ साखळी फेरीतील गुणतालिकेत अव्वलस्थानी असला तरी साखळी सामन्यापर्यंत फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये जमेकाच्या गड्यांनी सर्वोच्च कामगिरी नोंदवली होती. मात्र या सामन्यात जमेकाच्या गोलंदाजांना यश आले नाही. 


​ ​

संबंधित बातम्या