CPL 2020: पोलार्डची 9 गगनचुंबी षटकारांची बरसात -VIDEO 

सुशांत जाधव
Sunday, 30 August 2020

सलग सहा सामन्यातील विजयासह नाइट रायडर्सचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानावर आहे.

केरेन पोलार्डच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर ट्रिनबागनो नाइट रायडर्सने कॅरेबिनय प्रीमियर लीगमधील विजयी धडाका कायम ठेवला. शनिवारी बारबडोस ट्रायडेंट्स विरुद्धच्या सामन्यात पोलार्डने 28 चेंडूत 72 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर संघाने रोमहर्षक सामन्यात दोन विकेट राखून विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात  जमेका तलावाजने सेंट किट्स अँण्ड नेविस पेट्रियट्सला 37 धावांनी पराभूत केले. 

 

CPL2020 : चॅम्पियन ब्रावोचा सुपर डुपर कॅच एकदा पाहाच!

सलग सहा सामन्यातील विजयासह नाइट रायडर्सचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानावर आहे. प्रथम फलंदाजी करताना  ट्रायडेंट्सने जॉनसन चार्ल्स (47) आणि कायल मायेर्स (42) यांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 7 गड्याच्या मोबदल्यात  148 धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आणि स्पर्धेत सलग पाच विजय मिळवलेल्या नाइट रायडर्सची सुरुवात खराब झाली. अवघ्या 62 धावांत अर्धा संघ तंबूत परतला असताना पोलार्डने सामना वळवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्याने 28 चेंडूत 9 षटकार खेचत 72 धावांचे योगदान दिले.  

कॅरेबियन लीगच्या मागील हंगामातील किंगची फटकेबाजी (व्हिडिओ)

ज्यावेळी पोलार्ड मैदानात आला त्यावेळी संघाच्या धावफलकावर  39 चेंडूत 87 धावांची आवश्यकता होती. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असल्याने लेंडन सिमंसने साथ सोडल्यानंतर नाइट रायडर्सला अखेरच्या चार षटकात 66 धावांची गरज होती.  पोलार्डने रेमंड रीफरच्या डावातील 17 व्या षटकात   4 षटकार खेचले.    


​ ​

संबंधित बातम्या