CPL2020 : निकोलसचा शतकी धमाका; धोनी स्टाइलनं दिला फिनिशिंग टच (Vidio)

सुशांत जाधव
Monday, 31 August 2020

151 धावांचे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुयाना अमेझॉनची सुरुवात खराब झाली.

त्रिनिनादच्या पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क ओवल मैदानात निकोलस पूरनने आपल्या भात्यातील फटकेबाजीने प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. गुयाना अमेझॉन वॉरियर्सकडून खेळणाऱ्या निकोलस पूरनने नाबाद शतकी खेळी करुन संघाला एकहाती विजय मिळवून दिला. आपल्या शतकी खेळीत त्याने 45 चेंडूत 4 खणखणीत चौकार आणि 10 षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. 18 व्या षटकात 18 धावांची गरज असताना तीन षटकार खेचत पूरनने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्सने निर्धारित 20 षटकात 5 बाद 150 धावा केल्या होत्या. जोशुआ डा सिल्वाने सेंट किट्सकडून सर्वाधिक 59 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय रामदिनने 37 धावांचे योगदान दिले. वॉरियर्सकडून कर्णधार क्रिस ग्रीनने सर्वाधिक दोन तर केविन सीनक्लेयर आणि रोमारिओनं प्रत्येकी एक-एक गडी बाद केला. 

लॉकडाउनमुळे नेमबाजी प्रशिक्षकावर पिस्तूल विकण्याची वेळ

151 धावांचे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुयाना अमेझॉनची सुरुवात खराब झाली. ब्रँडन किंग (14), केविन सीनक्लेयर (5) आणि शिमरॉन हेटमायर (1) स्वस्तात माघारी फिरले. हुकमी फलंदाज माघारी फिरल्यानंतर निकोलस पूरनने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने रॉस टेलरच्या साथीने सामना सहज खिशात घातला. एवढेच नाही तर त्याने षटकाराने सामन्याला फिनिशिंग टच दिला. रॉस टेलरने 27 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 25 धावांचे योगदान दिले.  


​ ​

संबंधित बातम्या