CPL 2020 : सामने विंडीजमध्ये आणि सट्टेबाजी भारतात; पाच जणांना अटक

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 5 September 2020

गुन्हे अन्वेषण विभागाने संबंधित आरोपींकडून 1 लाख 4 हजार नकदसह 3 लॅपटॉप, 11 मोबाईल फोन, एक एलईडी टिव्ही, सट्टेबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या चिठ्या आणि सेटअप बॉक्स जप्त केला आहे.

CPL2020 : सामन्यात पाऊस अन् पावसात तो धावला! (Video)

वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या कॅरेबिय लीगनंतर भारतात सट्टेबाजी सुरु झाल्याचे समोर आले आहे. फरीदाबाद गुन्हे अन्वेषण विभागाने सूरजकुंड पोलिस हद्दीतील सोसाटीमध्ये बसून सट्टेबाजी करणाऱ्यांचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने संबंधित आरोपींकडून 1 लाख 4 हजार रोकड, 3 लॅपटॉप, 11 मोबाईल फोन, एक एलईडी टिव्ही, सट्टेबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या चिठ्या आणि सेटअप बॉक्स जप्त केला आहे.

CPL2020 : सामन्यात पाऊस अन् पावसात तो धावला! (Video)

सर्व आरोपी फरीदाबाद जिल्ह्यातील  एनआयटी परिसरातील रहिवासी आहेत.  जितेंद्र, प्रवीण उर्फ घोसी, गौरव उर्फ टिंकू, नीरज कुमार उर्फ हनी, दिविज उर्फ हनी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुरुवारी कॅरेबियन लीगमध्ये झालेल्या जमेका विरुद्ध सेंट किट्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान सट्टेबाजी सुरु होती. हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. पहिल्या डावातील केवळ पाच षटकांचाच खेळ झाला होता. 

CPL2020: हेटमायरसह निकोलस-पोलार्ड ठरताहेत लक्षवेधी

पोलिस अधीक्षक्षक धारणा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळानुरुप सट्टेबाजीच स्वरुपही बदलले आहे. पूर्वी फोनवरुन भाव विचारण्याचा प्रकार घडायचा. आता मोबाईलवर न बोलता सट्टेबाजी सुरु असल्याचे दिसून येत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी एलईटी टीव्हीवरील सामना पाहत प्रत्येक चेंडूवर काय होणार, पंच कोणता निर्णय देणार यावर सट्टा लावत होते. सट्टेबाज दरवेळी आपले स्थान बदलत होते. याची माहिती व्हाटसअपच्या माध्यमातून शेअर केली जायची, अशी माहितीही संबंधित पोलिस अधिकाऱ्याने दिली.  


​ ​

संबंधित बातम्या