CPL2020 : 6,6,6,6,6.... पोलार्डने केलीय षटकारांची बरसात!

सुशांत जाधव
Tuesday, 8 September 2020

त्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार केरन पोलार्डने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. 9 सामन्यातील 7 डावात पोलार्डने सर्वाधिक 20 षटकार खेचले आहेत.

कॅरेबियन लीग स्पर्धेचा थरार शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर क्रिकेटच्या मैदानात रंगलेली ही पहिली स्पर्धा आहे. स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या ट्रिनबागो नाइट रायडर्स आणि जमेका तलावाज यांच्यात पहिली सेमीफायनल रंगणार आहे.  2015, 2017, 2018 मध्ये नाइट रायडर्सने जेतेपदावर कब्जा मिळवला होता. चौथ्यांदा चॅम्पियन होण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरतील. 

सिक्सर किंग पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत 

त्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार केरन पोलार्डने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. 9 सामन्यातील 7 डावात पोलार्डने सर्वाधिक 20 षटकार खेचले आहेत. एका अर्धशतकासह त्याने नावे 207 धावा आहेत. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा जमेकेचा ग्लेन फिलिप्स (314) या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 18 षटकार खेचले आहेत. एविन लेविसने 18 षटकार खेचले असून आंद्रे रसेल 16 षटकारांसह चौथ्या तर डरेन ब्रावो 14 षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे. 

CPL 2020 : कोलांड्या उड्या मारुन सिलेब्रेशन! पाहा केविन-राशिद यांच्यातील खतरनाक 'टशन' (VIDEO)

केरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली नाइट रायडर्स संघाने कमालीचा खेळ दाखवला आहे. त्यांनी स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. आपला विजयी रथ कायम ठेवून ते फायनलमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असतील. दुसरीकडे जमेका तलावाज  संघातील गडी आपल्यातील क्षमता पणाला लावून अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी प्रयत्नशील असतील.  जमेकाने 2013 आणि 2016 मध्ये दोनवेळा जेतेपद पटकावले आहे. पुन्हा चॅम्पियन खेळी करण्याचा ते प्रयत्न करतील.


​ ​

संबंधित बातम्या