CPL 2020 Points Table : ट्रिनबागो नाइट रायडर्स अपराजित; पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर

सुशांत जाधव
Friday, 28 August 2020

यंदाच्या स्पर्धेत ट्रिनबागो नाइट रायडर्स हा संघ प्रबळ दावेदार समजला जात आहे. गुणतालिकेत आघाडी घेऊन त्यांनी स्पर्धेत मजबूत स्थितीत असल्याचे दाखवून दिले. आगामी सामन्यात संघ सातत्य कायम राखत जेतेपदावर विक्रमी मोहर उमटवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत सर्वाधिक जेतेपद मिळवणारा आणि भारतीय कनेक्शन असणारा ट्रिनबागो नाइट रायडर्स गुणतालिकेत आघाडीवर आहे.  ट्रिनबागो नाइट रायडर्सने आतापर्यंत सर्वच्या सर्व पाच सामने जिंकत अव्वलस्थान मिळवले आहे. सेंट लूसिया ज्यूक्स 6 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.   

कॅरेबियन लीगच्या मागील हंगामातील किंगची फटकेबाजी (व्हिडिओ)

बारबोडोस ट्रायडेंट्सने 5 सामने खेळले असून 2 सामन्यातील विजयासह त्यांच्या खात्यात 4 गुण जमा झाले आहेत. गुयाना अमेझॉन वॉरियर्स या यादीत चौथ्या स्तानावर आहे. त्यांनी 6 पैकी केवळ 2 सामन्यासह 4 गुण कमावले असून जमेका तलायवाज 5 पैकी 2 सामन्यातील विजयासह पाचव्या क्रमांकावर आहे.  सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स संघाला 5 सामन्यात केवळ एकच विजय गवसला असून ते या यादीत सर्वात तळाला आहेत. यंदाच्या स्पर्धेत ट्रिनबागो नाइट रायडर्स हा संघ प्रबळ दावेदार समजला जात आहे. गुणतालिकेत आघाडी घेऊन त्यांनी स्पर्धेत मजबूत स्थितीत असल्याचे दाखवून दिले. आगामी सामन्यात संघ सातत्य कायम राखत जेतेपदावर विक्रमी मोहर उमटवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

गुयाना अमेझॉन वारियर्सचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शिमरॉन हेटमायरने 6 सामन्यातील 6 डावात 33.80 च्या सरासरीने सर्वाधिक 169 धावा केल्या आहेत.  कायले मेयर्स (बारबोडोस ट्रायडेंट्स) आणि इविन लुईस ( सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स) 161 धावांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.  गोलंदाजीमध्ये जमेका तलायवाजकडून खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानने सर्वाधिक 12 बळी टिपले आहेत.  ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा इमरान ताहिरने 11 बळी घेतले असून न्यूझीलंडचा आणि सेंट लुसिया झूक्सकडून मैदानात उतरलेल्या स्कॉटनेही 11 बळी घेतले आहेत. 

कॅरेबियन लीग गुणतालिका 

संघ  सामने  विजय पराभव  अनिर्णित गुण
त्रिनबागो नाइट रायडर्स  5 5 0 0 10
सेंट लुसिया जूक्स  6 4 2 0 8
बारबाडोस ट्रायडेंट 5 2 3 0 4
गुयाना अमेझॉन वॉरियर्स 6 2 4 0 4
जमेका तलावाज 5 2 3 0 4
सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स  5 1 4 0 2

 


​ ​

संबंधित बातम्या