CPL 2020 : क्रिकेटच्या मैदानात किकचा साक्षात्कार; तेही प्रतिस्पर्धी खेळाडूवर (Video)

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 6 September 2020

 रसेल फलंदाजी करत असताना राशिदने टाकलेला चेंडू यष्टीला स्पर्श करुन यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. बेल्स न पडल्यामुळे रसेलला नाबाद ठरवण्यात आले. पंचाच्या निर्णायने रसेलही आश्चर्यचकित झाला. पंचांनी नाबाद दिल्यानंतर रसेलने राशिदला चिडवल्याचा प्रकार पाहायला मिळाला.

क्रीडा डेस्क : वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन लीगमध्ये मैदानात प्रतिस्पर्धी खेळाडूंच्यातही अनोख्या पद्धतीने गंमत-जम्मत सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळते. या स्पर्धेतील सेलिब्रेशनची धम्माल, अफलातून क्षेत्ररक्षण, तुफान फटकेबाजी यासह दोन प्रतिस्पर्धी संघातील खेळीमेळीचे वातावरण अनुभवायला मिळते. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आणि जमेका तलावाजकडून खेळणारा आंद्रे रसेल आणि बारबाडोस ट्रायडेंट्सच्य़ा ताफ्यातील अफगाणिस्तानचा राशिद खान यांच्यात अशीच धम्माल मजा-मस्तीचा क्षण अनुभवायला मिळाला.  

UAE त रंगणाऱ्या IPL चं संपूर्ण वेळापत्रक, आबूधाबीच्या मैदानात रंगणार सलमीचा सामना

जमेका तलावाज आणि बारबाडोस ट्रायडेंट्स यांच्यात शनिवारी रंगलेल्या सामन्यात राशिद प्रतिस्पर्धी संघातील रसेलला लाथ मारतानाचे चित्र पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  रसेल फलंदाजी करत असताना राशिदने टाकलेला चेंडू यष्टीला स्पर्श करुन यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. बेल्स न पडल्यामुळे रसेलला नाबाद ठरवण्यात आले. पंचाच्या निर्णायने रसेलही आश्चर्यचकित झाला. पंचांनी नाबाद दिल्यानंतर रसेलने राशिदला चिडवल्याचा प्रकार पाहायला मिळाला. त्यानंतर मजेत राशिदने त्याला किक मारत असल्यासारखे केले. दोघांच्यातील मजेशीर आणि खिलाडीवृत्तीचा अदभूत क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.  

  IPL 2020 : कोहली सरावानंतर असा दूर करतो थकवा; पाहा खास फोटो 

या सामन्यात जमेका तलावाजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 161 धावा केल्या होत्या. यात जरमेनच्या 74 आणि रसेलच्या 54 धावांचा समावेश होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बारबाडोजची सुरुवात खराब झाली. जोनाथन कार्टर  (45), जेसन होल्डर (69) यांनी दमदार खेळी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर मिचेल सँटनरने 21 चेंडूत 35 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.  


​ ​

संबंधित बातम्या