CPL 2020 : कोलांड्या उड्या मारुन सिलेब्रेशन! पाहा केविन-राशिद यांच्यातील खतरनाक 'टशन' (VIDEO)
जिमनॅस्टिक स्टाइल सेलिब्रेशन करणाऱ्या सिनक्लेयरला बोल्ड केल्यानंतर राशिदनेही केली मजेशीर हावभाव
कॅरेबियन लीगमध्ये बारबाडोस ट्रायडेंट आणि गुयाना अमेझॉन यांच्यात रंगलेल्या 23 व्या सामन्यात विंडीज क्रिकेटर केविन सिनेक्लेयर अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. खेळातील तिसऱ्या षटकात तीन गडी बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज शाय होप मैदानात उतरला. तो अवघ्या पाच धावांवर असताना गोलंदाजीस असलेल्या सिनेक्लेयरच्या डोक्यावरुन चेंडू मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. सिनेक्लेयरने कोणतीही चूक न करता त्याचा झेल टिपत शाय होफला तंबूचा रस्ता दाखला. बारबाडोसला दिलेला हा धक्का खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर सिनेक्लेयरने कोलांट्या उड्या मारत आनंद व्यक्त केला. त्याचा हा अंदाज चांगलाच लक्षवेधी होता. सोशल मीडियावर त्याच्या या कृतीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
AMAZING SCENES! What a catch and celebration by Kevin Sinclair #CPL20 #GAWvBT #CricketPlayedLouder pic.twitter.com/GmY7B8OVwk
— CPL T20 (@CPL) September 1, 2020
राशिद खानने सिनक्लेयरला क्लिन बोल्ड केल्यानंतर आणखी एकदा मजेशीर प्रकार मैदानात घडल्याचे पाहायला मिळाले. सिनक्लेयरसारखे सेलिब्रेशन करण्याची नक्कल करत राशीदने त्याला तंबूत धाडल्याचे पाहायला मिळाले. कॅरेबियन लीगमधील 22 व्या सामन्यात आणखी लो स्कोअरिंगचा थरार पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बारबाडोस ट्रायडेंट संघाचा डाव निर्धारित 20 षटकात अवघ्या 92 धावांत आटोपला. सलामीवीर चार्लेस आणि ग्रेव्सला खातेही उघडता आले नाही.
Rashid Khan with a beauty of a wicket and his take on Sinclair's celebration. #CPL20 #GAWvBT #CricketPlayedLouder #GooglyMagicMoment pic.twitter.com/EahgnVwUwt
— CPL T20 (@CPL) September 2, 2020
के मेयर्स 10 धावा करुन माघारी फिरला. तर कर्णधार जेसन होल्डरही शून्यानर बाद झाला. आघाडी कोलमडल्यानंतर सँटनरने केलेल्या 36 धावांच्या जोरावर ट्रायडंटने 92 धावांवर्यंत मजल मारली. ट्रायडंटने दिलेले लक्ष्य गुयाना अमेझॉनने 8 गडी राखून 20 चेंडू राखून पार केले. सलामीवीर ब्रँडन किंगने नाबाद 51 धावांची खेळी केली. केवीन सिनक्लेयर 3 आणि शिमरॉन हेटमायर 9 धावा करुन माघारी फिरल्यानंतर निकोलस पूरनने 18 धावांची नाबाद खेळी करत सलामीवीराला उत्तम साथ दिली.