CPL 2020 : नाइट रायडर्संनी फायनल रात्रही गाजवली; विक्रमी चौकारासह ठरले चॅम्पियन!

टीम ई-सकाळ
Friday, 11 September 2020

कॅरेबियन प्रीमियर लीगच्या 2020 मधील हंगामाचे विजेतेपद ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाने मिळवले आहे.

कॅरेबियन प्रीमियर लीगच्या 2020 मधील हंगामाचे विजेतेपद ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाने मिळवले आहे. या लीगमधील नाइट रायडर्सचा हा 12 वा सामना होता आणि या अंतिम सामन्यात देखील ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाने विजेतेपद मिळवत संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहण्याचा कारनामा केला. आज गुरुवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ट्रिनबागो नाइट रायडर्सने सेंट लुसिया ज्यूक्सचा 8 गडी राखून पराभव केला. 

एकदिवसीय क्रिकेट मध्ये ऑस्ट्रेलियाला अजून मेहनत करण्याची गरज - रिकी पॉन्टिंग

ट्रिनबागो नाइट रायडर्स आणि सेंट लुसिया ज्यूक्स यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात, सेंट लुसिया ज्यूक्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 154 धावा केल्या होत्या. त्यानंतर ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाने 18.1 षटकातच 154 धावांचे लक्ष गाठले. त्यामुळे ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाने चौथ्यांदा कॅरेबियन प्रीमियर लीगचा खिताब पटकावला आहे. सेंट लुसिया ज्यूक्स संघातील फ्लेचरने सर्वाधिक 39 धावा केल्या. यानंतर डेयलने 29 आणि नजीबुल्लाहने 24 धावा केल्या. नाइट रायडर्सच्या केरॉन पोलार्डने धारदार गोलंदाजी करत 30 धावा देऊन चार बळी घेतले. सेंट लुसिया ज्यूक्स संघाचे नियमित अंतराने गडी बाद होत राहिल्याने धावांची गती मंदावली होती.  

लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनी 'राफेल' विषयी म्हणतो...

त्यानंतर सेंट लुसिया ज्यूक्स संघाने दिलेल्या 154 धावांचा पाठलाग करताना, ट्रिनबागो नाईट रायडर्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ट्रिनबागो नाईट रायडर्सचे टिऑन वेबस्टर आणि टिम सिफर्ट अवघ्या 19 धावांवर परतले. मात्र सिमन्सने संघाची धुरा एका बाजूने पकडत अर्धशतक केले. व सिमन्सला डॅरेन ब्राव्होचा जोरदार पाठिंबा मिळाला. या दोन्ही फलंदाजांनी नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. सिमन्सने 49 चेंडूत 84 धावा केल्या तर ब्राव्होने 47 चेंडूत 58 धावा केल्या.      

 


​ ​

संबंधित बातम्या