CPL2020 : हेटमायरसह निकोलस-पोलार्ड ठरताहेत लक्षवेधी

सुशांत जाधव
Thursday, 3 September 2020

हेटमायरने 9 सामन्यातील 9 डावात 33.57 च्या सरासरीनं आणि 132.02 च्या स्ट्राइक रेटने 235 धावा केल्या आहेत. यात त्याने तीन अर्धशके ठोकली आहेत.

कॅरेबियन लीगमध्ये 8 पैकी 8 सामने जिंकून ट्रिनबागो नाइट रायडर्सने आपला दबदबा दाखवून दिलाय. त्यांच्या पाठोपाठ 9 पैकी 5 सामन्यातील विजयासह गुयाना अमेझॉन वॉरियर्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. गुयानाचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायरने आतापर्यंतच्या सामन्यात सर्वाधिक अर्धशतके लगावली आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. ग्लेन फिलिप्सने 7 सामन्यातील 7 डावात 41.33 ची सरासरी आणि 128.50 च्या स्ट्राइक रेटने 248 धावा केल्या आहेत. केरन पोलार्डने 7 सामन्यातील 6 डावात 55 ची सरासरी आणि सर्वाधिक 206.25 च्या स्ट्राइक रेटने 165 धावा केल्या आहेत.

चाहत्याला CSK चा प्रतिप्रश्न; हुशार कॅप्टन असताना उप-कॅप्टनची चिंता कशाला?

हेटमायरने 9 सामन्यातील 9 डावात 33.57 च्या सरासरीनं आणि 132.02 च्या स्ट्राइक रेटने 235 धावा केल्या आहेत. यात त्याने तीन अर्धशके ठोकली आहेत. सर्वधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत निकोलस पूरन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 9 सामन्यात एका शतकासह  234 धावा केल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या 24 सामन्यात शतकी खेळी करणारा निकोलस हा एकमेव फलंदाज आहे. 

रैना-चेन्नई फ्रॅंचाईस यांच्यात समेट?

गोलंदाजांच्या यादीत मुजीब उर रहिम आघाडीवर आहे. बारबाडोस ट्राइडेंट्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या फिरकीपटूने 7 सामन्यात सर्वाधिक 13 बळी मिळवले आहेत. आयपीएलमध्ये हा गडी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यातून खेळतो. या कामगिराचा त्याला युएईत रंगणाऱ्या स्पर्धेतही फायदा निश्चितच होईल. गुयाना अमेझॉन वॉरियर्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या  दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिरने 9  सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत. कॅरेबियन लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे दोन्ही गोलंदाज हे फिरकीपटू आहेत. 
 
 
 


​ ​

संबंधित बातम्या