कॅरेबियन लीगमध्ये भारताच्या प्रवीण तांबेची हवा; एकदा व्हिडिओ पाहाच

सुशांत जाधव
Monday, 7 September 2020

आतापर्यंत तीन सामन्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या असून संघाच्या विजयात उपयुक्त योगदान दिले आहे.

आयपीएलसाठी अपात्र ठरल्यानंतर कॅरेबियन लीगमध्ये सहभागी झालेला भारताचा 48 वर्षीय प्रवीण तांबे आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेत अपराजित राहिलेल्या त्रिनबागो नाइट रायडर्सकडून त्याने उपयुक्त कामगिरी केली असून अनेक क्रिकेट चाहत्यांची मनंही जिंकली आहेत.  
फिरकीपटूने आपल्यातील क्षेत्ररक्षणाचा अदभूत नजारा दाखवून देत वय हा फक्त आकडा असतो हेच दाखवून दिल्याचे पाहायला मिळाले.

CPL 2020 : सेमी फायनलच्या लढती ठरल्या, कोण-कोणाविरुद्ध भिडणार?

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी झालेल्या  सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स विरुद्धच्या सामन्यात त्याने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने दमदार खेळ दाखवला. या सामन्याती त्याने टिपलेला अफलातून झेल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. पॅट्रियट्सच्या डावातील  सातव्या षटकात घातक फलंदाज असलेल्या  बेन डंकचा अफलातून झेल टिपला. फवाद अहमदच्या गोलंदाजीवर बेन डंकने रिव्हर्स स्वीप फटका लगावण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची कड घेऊन  हवेत उडाला. शॉट थर्डमॅनला उभा असलेल्या प्रवीण तांबेनं आपल्यातील चपळता दाखवून देत अशक्य वाटणाऱ्या झेल टिपत बेनला तंबूत धाडले.  

चुकीला माफी नाही! महिला अधिकाऱ्याला चेंडू लागल्यानंतर जोकोविचला ठरवले अपात्र (Video)

क्षेत्ररक्षणात आपली ऊर्जा दाखवल्यानंतर तांबेन गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. अप्रतिम झेल टिपल्यानंतर पुढच्याच षटकात त्याने  जोशुआ डी सिल्वाला पायचीत केले. आतापर्यंत तीन सामन्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या असून संघाच्या विजयात उपयुक्त योगदान दिले आहे. मागील वर्षी आयपीएलच्या लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने त्याला आपल्या ताफ्यात सामील करत अनोखा विक्रम रचला होता. आयपीएलमधील तो सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरला होता. पण बीसीसीआयच्या परवानगीशिवाय एका लीगमध्ये सहभागी झाल्यामुळे त्याला आयपीएवमधून अपात्र ठरविण्यात आले होते.  


​ ​

संबंधित बातम्या