CPL 2020 : भारताचा गडी ही उतरणार मैदानात, पाहा संपू्र्ण संघांची यादी

सुशांत जाधव
Thursday, 6 August 2020

आयपीएलमध्ये अपात्र ठरलेला भारताचा  प्रवीण तांबे ट्रिनबागो नाइट राइडर्सकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. कॅरेबियन लीगमधील संघाचा सदस्य होणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे.

कॅरेबियन प्रीमियर लीगचा आठवा हंगाम 18 ऑगस्टपासून रंगणार आहे. कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातले असताना विंडीजमध्ये रंगणारी स्पर्धा ही क्रिकेट जगतातील पहिली लीग स्पर्धा ठरेल. कॅरेबियन प्रीमियर लीगमधील सर्व सामने त्रिनिदाद येथे खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामना 10 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येईल. आठव्या हंगामासाठी स्पर्धेत सहभागी संघाने अनेक दिग्गजांना आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्यावर भर दिल्याचे दिसते.

क्रिडा क्षेत्रातील क्रिकेटसह अन्य मैदानातील घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा 

आयपीएलमध्ये अपात्र ठरलेला भारताचा  प्रवीण तांबे ट्रिनबागो नाइट राइडर्सकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. कॅरेबियन लीगमधील संघाचा सदस्य होणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. याशिवाय राशिद खान, मोहम्मद नबी या दिग्गजांचाही स्पर्धेत सहभाग असेल. जाणून घेऊयाक कॅरेबियन प्रीमियरमधील संघ आणि संघातील खेळाडू...

ENGvsPAK First Test : नो बॉलच्या नव्या तंत्राचा प्रयोग

ट्रिनबागो नाइट राइडर्स  
ड्वेन ब्रावो, केरेन पोलार्ड, सुनील नरेन, कॉलिन मुन्रो, फवाद अहमद, डॅरेन ब्रावो, लेंडल सिमंस, खेरी पिएरे, टिम सिफर्ट, सिकंदर रझा, अँडरसन फिलिप, प्रवीण तांबे, जेडन सील्स, आमिर जंगू, टियोन वेब्सटर, अकील होसेन, मुहम्मद अली खान.
 

 सेंट लूसिया जूक्स  
रायली रूसो, मोहम्मद नबी, डॅरेन सॅमी, कॉलिन इंग्रम, आंद्रे फ्लेचर, केस्रिक विलियम्स, एनरिक नॉर्टजे, ओबेद मॅक्कॉय, रहकीम कॉर्नवॉल, मार्क देयाल, नूर अहमद, किमानी मेलियस, लेनिको बाउचर, केवम हॉज, जॅवेल ग्लेन, साद बिन जफर.

 गयाना अमेझन वॉरियर्स  
इमरान ताहिर, निकोलस पूरन, ब्रँडन किंग, रॉस टेलर, शिमरोन हेटमायर, क्रिस ग्रीन, कॅस अहमद, कीमो पॉल, शेरफन रदरफॉर्ड, रोमारियो शेफर्ड, नवीन उल हक, चंद्रपॉल हेमराज, केविन सिंक्लेर, एशमीड नेड, ओडीन स्मिथ, एंथनी ब्रैम्बल, जसदीप सिंह.
 
बारबाडोस ट्रायडेंट्स
राशिद खान, जेसन होल्डर, मार्कस स्टोइनिस, हॅरी गर्नी, एलेक्स हेल्स, जॉनसन चार्ल्स, शाय होप, हेडन वॉल्श जूनियर, एश्ले नर्स, जोनाथन कार्टर, रेमन राइफर, काइल मेयर्स, जोशुआ बिशप, नइम यंग, जस्टिन ग्रीव्स, रहमनुल्लाह गुरबाज, शयन जहांगीर.

 जमेका तलावास
आंद्रे रसेल, संदीप लामिचाने, कार्लोस ब्रेथवेट, रोवमॅन पॉवेल, तबरेज शम्सी, ग्लेन फिलिप्स, चॅडविक वॉल्टन, ओशेन थॉमस, आसिफ अली, फिडेल एडवर्ड्स, प्रेस्टन मॅक्स्वीन, आंद्रे मॅककार्थी, निकोलस किर्टन, जीवर रॉयल, बॉनर, वीरास्वामी परमॉल, रेयान परसौद.

सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियट्स
क्रिस लिन, बेन डंक, एविन लुइस, फेबियन एलेन, रसी वॅन डर डुसेन, सोहेन तनवीर, ईष सोढी, शेल्डन कॉट्रेल, दिनेश रामदीन, रेयाद एमरिट, डैनिस बुली, अलजारी जोसेफ, जोशुआ डे सिल्वा, डॉमिनिक ड्रेक्स, कॉलिन आर्चीबलद, जॉन रस, सनी सोहेल.
 


​ ​

संबंधित बातम्या